मुंबईत तौत्के वादळामुळे 'बार्ज P305' जहाजातून 273 पैकी 177 जणांची सुटका, तर आणखी जहाज अडकल्याची शक्यता

 'बार्ज P305' हे जहाज वादळामुळे समुद्रात अडकले होते, ज्यात एकूण 273 लोकं असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

Updated: May 18, 2021, 05:59 PM IST
मुंबईत तौत्के वादळामुळे 'बार्ज P305' जहाजातून 273 पैकी 177 जणांची सुटका, तर आणखी जहाज अडकल्याची शक्यता

मुंबई : चक्रीवादळ तौत्केमुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावादळामुळे अनेक ठिकाणी आपातकालीन परिस्थिती उपस्थित झाली होती. चक्रीवादळादरम्यान एकूण 4 SOS कॉल आले, ज्यात अजूनही नौसेना आणि भारतीय कॉस्ट गार्ड कार्यरत आहेत. 'बार्ज P305' हे जहाज वादळामुळे समुद्रात अडकले होते, ज्यात एकूण 273 लोकं असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

बार्ज P305 जहाजातून 177 जणांची सुटका

बार्ज P305 या जहाजात एकूण 273 लोकं होते. आयएनएस कोची आणि आयएनएस कोलकाता या युद्ध बोटी तसेच दुसऱ्या जहाजांचा मदतीने त्यात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी कार्य सुरु आहे. बार्ज P305 मध्ये अडकलेल्या लोकांमधून आतापर्यंत 177 लोकांची सुटका करण्यात आली आहे. आयएनएस कोलकाता आणि आयएनएस कोची या जाहाजांनी आतापर्यंत 111 लोकांची यातून सुटका केली आहे. तर ऑफशोर सपोर्ट व्हेलमेंट (offshore support vessel) ग्रीटशिप अहिल्याने 17 आणि ऑफशोर सपोर्ट व्हेलमेंट Ocean Energy ने 18 लोकांची सुटका केली आहे.

बार्ज गॅल कन्स्ट्रक्टरमध्ये अडकले 137 लोकं

बार्ज गॅल कन्स्ट्रक्टरवर एकूण 137 लोकं काम करत होते. अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी टोईंग वेटर वॉटर लिली, 2 सपोर्ट व्हेल आणि CGS सम्राट या बोटी गुंतलेल्या आहेत. Naval P8I surveillance aircraft आणि भारतीय नौदलाच्या हेलिकॉप्टरची मदतही घेतली जात आहे.

101 लोकांना वाचवण्याचे काम सुरू

ऑयल रिग सागर भूषण या बोटीर एकूण 101 लोकं अडकले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी आयएनएस तलवार बोट कामाला लागली आहे.

बार्ज SS-3 या मध्ये 196 लोकं

बार्ज बार्ज SS-3 बोटीवर 196 लोकं आहेत आणि सध्या ते पिपवाव बंदराच्या 50 NM दक्षिण-पूर्वेस आहे. हवामान निट झाल्यावर बचाव कार्य सुरु करण्यात येईल आणि SAR ऑपरेशनसाठी नेव्हीच्या P81 वर नजर ठेवण्यासाठी विमान आणि हेलिकॉप्टर्सची मदत घेतली जात आहे.