कोरोनाच्या बळींची संख्या १६०० च्या वर

चीनमध्ये कोरोना व्हायरसचा धुमाकूळ सुरुच

Updated: Feb 15, 2020, 08:47 AM IST
कोरोनाच्या बळींची संख्या १६०० च्या वर title=

नवी दिल्ली : चीनमध्ये कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांचा आकडा आता दीड हजारापलिकेडे गेला आहे. हुबे प्रांतात आणखी १३९ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला, तर २ हजार ४२० नवे रुग्ण आढळून आले. ६६ हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या हुबे प्रांतात सर्वात जास्त आहे. 

चीनमध्ये कोरोना व्हायरसने धुमाकुळ घातला आहे. आतापर्यंत १६३१ लोकांचा यामुळे मृत्यू झाला आहे. शुक्रवारी चीनमध्ये १४३ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर हुबेई प्रांतांत २४२० नवे रुग्ण आढळले आहेत.

चीनमध्ये हुबेई प्रांतात ५४ हजाराहून अधिक लोकं या व्हायरसच्या संपर्कात आले आहेत. तर संपूर्ण चीनमध्ये ६७ हजाराहून अधिक लोकांमध्ये कोरोनाचे लक्षणं आढळून आली आहेत.

चीनच्या बाहेर ५८० लोकांना याची लागण झाली आहे. तर चीन सोडून इतर ३ देशांमध्ये या व्हायरसमुळे ३ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये फिलीपींस, हाँगकाँग आणि जपानचा समावेश आहे.

वुहानमध्ये तयार करण्यात आलेल्या विशेष रुग्णालयात १ हजार रुग्णांना दाखल करण्यात आलं आहे.