लाकडी बॉक्समध्ये आढळले अल्पवयीन भावा-बहिणीचे मृतदेह, घात की अपघात? मन सुन्न करणारी घटना...

Delhi Crime News : दिल्लीतल्या जामिया नगर परिसरात एका कंपनीत ठेवण्यात आलेल्या लाकडी बॉक्समध्ये अल्पवयीन भावा-बहिणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. घटनेच्या दिवशी दुपारपासून ही भावंडं बेपत्ता झाली होती. 

Updated: Jun 7, 2023, 08:11 PM IST
लाकडी बॉक्समध्ये आढळले अल्पवयीन भावा-बहिणीचे मृतदेह, घात की अपघात? मन सुन्न करणारी घटना... title=

Delhi Crime: दिल्लीतल्या जामिना नगर (Jamia Nagar)  परिसरात मन सुन्न करणारी एक घटना घडली आहे. एका लाकडी बॉक्समध्ये (Wooden Box) सख्ख्या भावा-बहिणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाी आहे. दुपारी जेवल्यानंतर ही अल्पवयीन भावंडं खेळण्यासाठी घराबाहेर पडली. पण बराच वेळ घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबियांनी शोधाशोध सुरु केली. बराच वेळ शोध घेतल्यानंतर दोनही भावंडांचे मृतदेह एका लाकडी बॉक्समध्ये आढळले. कुटुंबियांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं, पण त्या आधीच त्यांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये आठ वर्षांचा मुलगा आणि सहा वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. 

शरीरावर कोणत्याही जखमा नाहीत
मृत मुलाचं नाव प्रसाद तर मृत मुलीचं नाव आरती असं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोघांच्या शरीरावर कोणत्याही जखमी आळढून आल्या नाहीत. दोघांचा गुदमरून मृत्यू  (Death by suffocation) झाला असावा अशी शक्यता पोलिसांनी (Delhi Police) वर्तवली आहे. दोनही भावंडांच्या मृ्त्यूचं खरं कारण शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानतंर स्पष्ट होईल.  मंगळवारी दुपारी चार वाजता जामिया नगर पोलिसांनी दोन लहान मुत्यू झाल्याचा फोन आला. 

त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घरापासून काही अंतरावर असलेल्या एका कंपनीच्या आवारातील लाकडी बॉक्समध्ये दोनही भावंडांचे मृतदेह आढळून आले. या कंपनीची सुरक्षा पाहणाऱ्या सुरक्षारक्षकाची ही मुलं असल्याचं स्पष्ट झालं आहे. बलबीर असं या सुरक्षारक्षकाचं नाव असून तो पत्नी आणि आपल्या दोन मुलांसह कंपनीच्या आवारातच राहतो. दुपारी साधारण तीन वाजण्याच्या दरम्यान जेवण झाल्यानंतर दोन्ही मुलं खेळण्यासाठी बाहेर आली. पण संध्याकाळ झाली तरी मुलं घरी परतली नाहीत. 

पालकांनी सुरु केली शोधाशोध
बराच वेळ मुलं घरी न आल्याने बरबीर आणि त्याच्या पत्नीने मुलांचा शोध सुरुकेला. आस-पासच्या मुलांकडेही त्यांनी विचारपूस केली. पण ही मुलं कुठे गेलीत याची माहिती कोणालाच नव्हती. त्याचवेळी बरबीर यांची नजर कंपनीच्या आवारात असलेल्या लाकडी बॉक्समध्ये पडली. त्यांनी बॉक्स उघडून पाहिला असता दोन्ही मुलं त्यात बेशुद्धा अवस्थेत पडलेली आढळली. बालबीर यांनी तात्काळ मुलांना बॉक्सबाहेर काढत रुग्णालयात दाखल केलं. पण उपचारापूर्वीच दोनही मुलांचा मृत्यू झाला होता. 

नेपाळहून आलं होतं कुटुंब
बलबीर आणि त्याचं कुटुंब नेपाळहून दिल्लीत आलं होतं. बलबीर पत्नी आणि दोन मुलांसह जमिया नगमध्ये राहतो. दोनही मुलांच्या अचानक जाण्याने बलबीर आणि त्याच्या पत्नीवर दु:खाचा डोंगर कोसळल आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. हा घात आहे की अपघात याचा शोध आता पोलीस घेत आहेत.