नवी दिल्ली: सिंधू सीमेवर एकीकडे तणावाचं वातावरण असतानाच आणखीन एक राजधानी दिल्लीतून मोठी बातमी येत आली. राजधानी दिल्लीत मोठा स्फोट झाला आहे. इस्रायल दूतावासाजवळ स्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये साधारण 4 ते 5 गाड्यांचं नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.
स्फोट झाल्यानंतर अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या. 4 ते 5 गाड्यांचं मोठ्य़ा प्रमाणात नुकसान झालं आहे. या स्फोटाचं नेमकं कारण अद्याप समजू शकलं नाही. सुदैवानं या स्फोटात कोणीही जखमी नसल्याची माहिती आतातरी मिळाली आहे. अद्याप या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे.
A low-intensity explosion happened near the Israel Embassy in Delhi, nature of explosion being ascertained. Some broken glasses at spot. No injuries reported; further investigation underway pic.twitter.com/xqIllrCZOQ
— ANI (@ANI) January 29, 2021
#WATCH | Delhi Police team near the Israel Embassy where a low-intensity explosion happened.
Nature of explosion being ascertained. Some broken glasses at the spot. No injuries reported; further investigation underway pic.twitter.com/RphSggzeOa
— ANI (@ANI) January 29, 2021
या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्पेशल टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. या स्फोटाचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. दिल्लीच्या सीम सील केल्या असतानाही हा स्फोट नेमका कसा घडला याचा तपास सुरू आहे.
अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं आहे. दिल्लीत बिटिंग द रिट्रीटचा सोहळा सुरू असताना ही घटना घडल्यामुळे मोठी खळबळ माजली आहे. अग्निशमन दलाचे जवान आणि दिल्ली पोलिसांची स्पेशल टीम घटनास्थळी दाखल झाली असून या स्फोटाबाबत चौकशी सुरू आहे.
We received a call at around 5:45 pm regarding blast after which we reached the spot. No injuries have been reported in the incident: Fire Officer Prem Lal pic.twitter.com/wST685x0jC
— ANI (@ANI) January 29, 2021
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक दिग्गज नेते आणि लोक जवळपास दीड ते 2 किमी अंतरावर होते. याचवेळी हा त्यांच्यापासून काही अंतरावर स्फोड घडवून आणण्यात आला आहे. तर दिल्लीमध्ये खळबळ माजवण्यासाठी हा स्फोड घडवून आणण्यात आल्याची माहिती दिली आहे.