दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना कोरोनाची लागण

दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. 

Updated: Jun 18, 2020, 06:42 AM IST
दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना कोरोनाची लागण

नवी दिल्ली : दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांना घशाचा त्रास जाणवू लागला होता. तसेच त्यांना तापही येत होता. त्यानंतर जैन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, त्यांची पहिली कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. त्यानंतर दुसरी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सध्या त्यांच्यावर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची प्रकृती खालावल्याने त्यांना मागिल मंगळवारी   दिल्लीतील राजीव गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सत्येंद्र जैन यांना श्वास घेण्यात त्रास होत होता. तसेच घशाचा त्रास आणि ताप येत होता. त्यांना सध्या रुग्णालयात ऑक्सिजन देण्यात येत आहे.

दरम्यान, आपल्याला त्रास होत आहे. तीव्र ताप आणि श्वासोच्छवासाच्या त्रासानंतर मला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मी तुम्हाला माहिती देत राहीन असे ट्विट रुग्णालयात दाखल झाल्यानंतर आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी केले होते.