धक्कादायक ! ऑक्सीजन सिलेंडरच्या बदल्यात तरुणीकडे शरीर सुखाची मागणी

सोशल मीडियावर संतापजनक प्रतिक्रिया

Updated: May 14, 2021, 09:26 PM IST
धक्कादायक ! ऑक्सीजन सिलेंडरच्या बदल्यात तरुणीकडे शरीर सुखाची मागणी  title=

मुंबई : कोरोनाच्या संकटात लोकं अडचणीत सापडले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पण या संकट काळात देखील माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना समोर आली आहे तो सोशल मीडियाच्या माध्यमातून. ज्यामध्ये लोकांच्या मजबुरीचा कसा गैरफायदा घेतला जात आहे. हे पुढे आलं आहे.

एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने एका मुलीच्या वडिलांना ऑक्सीजन सिलेंडरच्या बदल्यात शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.

सोशल मीडियामुळे हा सगळा प्रकार पुढे आला. भावरीन कंधारी नावाच्या एका ट्विटर यूजरने ट्विट करत म्हटलं की, 'माझ्या मैत्रिणीच्या बहिणीला आपल्या वडिलांसाठी ऑक्सीजनची गरज होती. तिच्या शेजारील व्यक्तीने सिलेंडर देण्याच्या बदल्यात शरीर सुखाची मागणी केली. यावर काय कारवाई करता येईल. कारण तो ही गोष्ट नाकारेल.

ट्विट व्हायरल

भावरीन कंधारीचं हे ट्विट आता सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. यावर लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. कोणी पोलिसात तक्रार दाखल करण्यास सांगत आहेत तर कोणी त्या व्यक्तीचं नाव सार्वजनिक करण्याचा सल्ला देत आहेत.

कोरोना काळात माणुसकी खरच संपत चालली आहे का असा प्रश्न या निमित्ताने पुन्हा उपस्थित होत आहे. संकटाच्या काळात देखील समाजात असलेले असे लोकं समाजासाठी शाप आहेत. असंच म्हणावं लागेल.