दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के

दिल्लीत पुन्हा भूकंपाचे धक्के

Updated: May 29, 2020, 09:27 PM IST
दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के

नवी दिल्ली : दिल्ली एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. हरियाणातील रोहतक हे भूकंपाचं केंद्र असल्याचं कळतं आहे. नोएडा, गाझियाबादमध्ये देखील भूकंपाचे धक्के जाणवले. ४.६ रिक्टरस्केल इतक्या तीव्रतेचा हा भूकंप होता. गेल्या काही दिवसांपासून राजधानी दिल्ली आणि आजुबाजुच्या परिसरात भूकंपाचे धक्के जाणवत आहेत.

रात्री ९ वाजून ८ मिनिटांनी हे भूकंपाचे धक्के जाणवले. जवळपास १० ते १५ सेंकद भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. अजूनपर्यंत कोणत्याही हानीची माहिती समोर आलेली नाही.