धक्कादायक ! अर्पिताच्या दुसऱ्या घरीही ईडीची धाड, नोटा मोजण्यासाठी मागवल्या मशीन

पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळा आणखी व्यापक होताना दिसत आहे. यामध्ये आणखी काही नावे पुढे येण्याची शक्यता आहे.

Updated: Jul 27, 2022, 09:47 PM IST
धक्कादायक ! अर्पिताच्या दुसऱ्या घरीही ईडीची धाड, नोटा मोजण्यासाठी मागवल्या मशीन title=

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये उघड झालेल्या शिक्षण घोटाळ्यात अर्पिता मुखर्जीच्या (Raid on arpita mukharjee second house) अडचणी आणखी वाढत आहेत. बुधवारी दुपारपासून ईडीचे पथक (ED officers) तिच्या दुसऱ्या घरी हजर असून तपास सुरू आहे. तिच्या घरी पुन्हा एकदा मोठी रक्कम सापडल्याचे वृत्त आहे. ही रक्कम इतकी जास्त आहे की, ईडीने नोट मोजण्याचे यंत्र मागवले आहे.

ईडीने अर्पिताच्या क्लब टाऊनमधील अपार्टमेंटवर छापा टाकल्याची माहिती मिळाली आहे. अशी माहिती मिळाली की तिथेही रोख लपवून ठेवण्यात आली. आता ईडीच्या तपासात तेथून पुन्हा नोटांचा ढीग सापडला आहे. किती रक्कम आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र ईडीने नोट मोजण्याचे यंत्र मागवले आहे. या प्रकरणात आतापर्यंत ईडीने 22 कोटींची रोकड जप्त केली आहे. सोबत विदेशी चलनही जप्त करण्यात आले आहे. मागच्या छाप्यात अर्पिताच्या घरातून 20 हून अधिक फोन आणि अनेक कंपन्यांचे कागदपत्रेही जप्त करण्यात आली होती.

याच शिक्षण घोटाळ्याप्रकरणी पश्चिम बंगाल सरकारमधील मंत्री पार्थ चॅटर्जी (Parth Chatterjee) यांनाही ईडीने अटक केली आहे. या घोटाळ्याप्रकरणी त्यांची अनेक तास चौकशीही करण्यात आली आहे. ब्लॅक डायरीबाबतही अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. अर्पिताच्या घरातून ईडीला मिळालेली हीच डायरी आहे. ही डायरी बंगाल सरकारच्या उच्च आणि शालेय शिक्षण विभागाची असल्याचे सांगण्यात येत आहे. या डायरीत 40 पाने आहेत, ज्यामध्ये बरेच काही लिहिले आहे. ही डायरी एसएससी घोटाळ्याचे अनेक पदर उघडू शकते.

मोठी गोष्ट म्हणजे ईडीला पार्थच्या घरातून वर्ग क आणि वर्ग ड सेवेत भरती झालेल्या उमेदवारांशी संबंधित कागदपत्रे मिळाली आहेत. पार्थ चॅटर्जी ग्रुप डी कर्मचाऱ्यांच्या भरतीमध्ये सक्रियपणे सहभागी असल्याचे पुरावे दाखवतात.

मात्र आतापर्यंत पार्थ चॅटर्जीकडून तपासात फारसे सहकार्य मिळालेले नाही. ईडीच्या म्हणण्यानुसार, त्यांनी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर इतकेच दिले आहे की त्याला काहीही माहिती नाही. अशा स्थितीत आगामी काळात पुराव्याच्या आधारे त्यांच्यासमोर आणखी प्रश्न उपस्थित होऊ शकतात. 

पार्थ चॅटर्जी यांच्या अडचणी आणखी वाढू शकतात. कारण घरातून जप्त केलेली रोकड पार्थची असल्याचे अर्पिताने चौकशीदरम्यान कबूल केले आहे. हा पैसा अर्पिता मुखर्जीशी निगडीत कंपन्यांमध्ये गुंतवण्याची योजना होती असा दावाही करण्यात आला आहे. रोख रक्कमही एक-दोन दिवसांत त्याच्या घरातून बाहेर काढण्याची तयारी होती. पण हे सर्व होण्याआधीच ईडीने नोटांचा तो डोंगर ताब्यात घेतला आणि या घोटाळ्याला अनेक नाट्यमय वळणे लागली.

सध्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM mamta Banerjee) यांनी या घोटाळ्यापासून स्वत:ला पूर्णपणे दूर केले आहे. त्या भ्रष्टांवर कठोर कारवाई करण्याबाबत बोलत आहेत, पण पार्थ चॅटर्जीबद्दल त्यांनी कोणतेही वक्तव्य केलेले नाही.