कन्हैय्या कुमार राजकारणात, 'सीपीआय'च्या राष्ट्रीय परिषदेत समावेश

विशेष म्हणजे गेल्या काही काळात कन्हैय्या कुमार हा विद्यार्थ्यांचा नेता असूनही राजकारणातील वादग्रस्त व्यक्तिमत्व म्हणून ओळखला गेला होता. 

Updated: Apr 29, 2018, 08:49 PM IST
कन्हैय्या कुमार राजकारणात,  'सीपीआय'च्या राष्ट्रीय परिषदेत समावेश title=

नवी दिल्ली : भारतीय कम्युनिस्ट पार्टी (सीपीआय) ने एस सुधाकर रेड्डी यांची पक्षाचे महासचिव म्हणून निवड केली आहे. तर, विद्यार्थ्यांचा नेता कन्हैया कुमारलाही राष्ट्रीय परिषदेत स्थान दिले आहे. कन्हैय्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. विशेष म्हणजे गेल्या काही काळात कन्हैय्या कुमार हा विद्यार्थ्यांचा नेता असूनही राजकारणातील वादग्रस्त व्यक्तिमत्व म्हणून ओळखला गेला होता. 

सीपीआयच्या २३व्या अधिवेशनात रेड्डी यांच्या निवडीवर एकमताने शिक्कामोर्तब होण्यापूर्वी १२५ सदस्यांच्या राष्ट्रीय परिषदेचीही निवड करण्यात आली. दोन वेळा लोकसभेचे सदस्य राहिलेले रेड्डी हे पहिल्यांदा २०१२ मध्ये पक्षाचे महासचिव बनले होते. 

सुधाकर रेड्डी यांची पक्षाच्या महासचिवपदी पदावर बिनविरोध निवड झाली. सीपीआयच्या केंद्रीय निर्णय बैठकीत केरळमध्ये १५ सदस्यांच्या निवड समितीत सी. दिवाकरन यांच्या नावाचा समावेश न केल्याबद्धल काही काळ विरोध व्यक्त झाला.