मुंबई : कोरोना साथीच्या दुसर्या लाटे दरम्यान, ईपीएफओ (कर्मचारी भविष्य निर्वाह निधी) चे 6 कोटी खातेदारांना जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत चांगली बातमी मिळवणार आहेत. जुलै महिन्यात ग्राहकांच्या पीएफ खात्यात मोठी रक्कम येणार असल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात आली आहे. कारण कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था अर्थात ईपीएफओ (EPFO) 8.5% व्याज ग्राहकांच्या खात्यात आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये हस्तांतरित करू शकते, यासाठी सरकारकडून मान्यता मिळाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कामगार मंत्रालयाच्या मंजुरीनंतर, 8.5% व्याज रक्कम जुलै अखेरपर्यंत ईपीएफओ ग्राहकांच्या खात्यात जमा होईल. मंत्रालयाच्या मंजुरीनंतर लवकरच ट्रांसफरची प्रक्रिया सुरू केली जाईल. यापूर्वी, मागील आर्थिक वर्षात 2019-20 मध्येही केवायसीमधील गडबडीमुळे अनेक ग्राहकांना व्याज मिळण्यासाठी 8 ते 10 महिन्यांपेक्षा जास्त काळ थांबावे लागले. देशातील 6.44 कोटी लोक या पीएफच्या योजनेत येतात.
ईपीएफओने आर्थिक वर्ष 2020-21 साठी व्याज दरात कोणताही बदल न करता 8.5% ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, जो मागील 7 वर्षातील सर्वात कमी व्याज दर आहे. यापूर्वी 2013 आर्थिक वर्षात ईपीएफवरील व्याजदर 8.5% होते. यापूर्वी सन 2019 च्या आर्थिक वर्षात 8.65% व्याजदर ईपीएफवर देण्यात आला. ईपीएफओने वित्तीय वर्ष 2018 मध्ये 8.55 टक्के व्याज दिले जात होते, जे मागील आर्थिक वर्षी 2016 मध्ये 8.8 टक्के होते. याआधी 2014 मध्ये या आर्थिक वर्षात हे प्रमाण 8.75 टक्के होते.
कोरोनाची दुसरी लाटचे वस्तूस्थिती लक्षात घेता ईपीएफओने पुन्हा एकदा आपल्या कोट्यावधी खातेदारांना दिलासा दिला आहे. ईपीएफओने कर्मचाऱ्यांना दुसऱ्यांदा त्यांच्या पीएफमधून आगाऊ रक्कम काढण्याची सुविधा दिली आहे. मागील वर्षी मार्चच्या सुरुवातीला, ईपीएफओने आपल्या ग्राहकांना हा दिलासा दिला होता. ज्यामध्ये कर्मचारी त्यांच्या पीएफमधील पैसे अॅडव्हान्समध्ये काढून घेऊ शकतात. ही काढलेली रक्कम परत करण्याची ही गरज नाही. त्यांनी काढलेली रक्कम त्यांच्या पीएफमधून वजा केली जाईल.