गृहकर्ज आणखी स्वस्त होण्याची शक्यता, आर्थिक मंदीची धोका

 गृहकर्ज (Home loan), कार लोन (Car loan) आणखी स्वस्त होण्याची शक्यता आहे. 

Updated: Mar 4, 2020, 09:10 AM IST
गृहकर्ज आणखी स्वस्त होण्याची शक्यता, आर्थिक मंदीची धोका title=

मुंबई : गृहकर्ज (Home loan), कार लोन (Car loan) आणखी स्वस्त होण्याची शक्यता आहे. जगभरात कोरोनाच्या भीतीने आर्थिक मंदीची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. भारतालाही त्याचे परिणाम भोगावे लागतील, अशी शक्यता आहे. सध्या मंदीचे सावट सुरु आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी भारतीय अर्थव्यवस्था झटका सहन करण्यासाठी सज्ज असल्याचे सुतोवाच केले आहे. याच सुतोवाचानंतर शेअर बाजारात व्याजाचे दर आणखी पाव टक्क्याने कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

भारतात व्याजाचे दर आधीच नीचांकी पातळीवर आहेत. (Home loan interest Rate Cut) अर्थव्यवस्था आधीच मंदीच्या गर्तेत आहे. अर्थव्यवस्थेचा वेग वाढवण्यासाठी सरकारने उचललेली पावले अपुरी पडत आहेत. हे सतत येणाऱ्या औद्योगिक उत्पादन आणि सेवा क्षेत्राच्या आकडेवारीवरून उघड आहे. त्यात कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचा डोलारा कोसळू लागला, तर भारताला त्याचा जोरदार हादरा बसू नये म्हणून हे पाऊल उचण्यात येत आहे. रिझर्व्ह बँक आधीच काही महत्वाची पावले उचलेल, असे जे पी मोर्गन या आर्थिक जगतातील महत्वाच्या परदेशी गुंतवणूकदार कंपनीचं म्हणणे आहे. 

एप्रिल महिन्यात रिझर्व्ह बँकेच्या मॉनेटरी पॉलिसी समितीची बैठक होणार आहे. पण कोरोनेची झळ त्याआधीच अर्थव्यवस्थेला बसलेली असेल. त्यामुळे रिझर्व्ह बँक चालू किंवा पुढील आठवड्यात व्याजाचे दर घटवण्याची घोषणा करेल, अशी शक्यता जे पी मोर्गनने व्यक्त केली आहे.

0