close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

फेसबुक, whatsapp आणि इन्स्टाग्राम डाऊन; नेटकऱ्यांचा जीव कासावीस

फोटो किंवा व्हिडिओ अपलोड आणि डाऊनलोड होत नसल्याच्या तक्रारी

Updated: Jul 3, 2019, 09:36 PM IST
फेसबुक, whatsapp आणि इन्स्टाग्राम डाऊन; नेटकऱ्यांचा जीव कासावीस

मुंबई: गेल्या काही तासांपासून जगभरात फेसबुक, व्हॉटसअॅप आणि इन्स्टाग्राम बंद पडल्याचा प्रकार समोर आला आहे. या तिन्ही ठिकाणी फोटो किंवा व्हिडिओ अपलोड आणि डाऊनलोड होत नसल्याच्या तक्रारी अनेकांनी केल्या आहेत. अनेकजण आपल्या व्यथा मांडण्यासाठी ट्विटरचा आधार घेत आहेत. त्यामुळे सध्या ट्विटरवर #whatsappdown , #instagramdown,  #facebookdown हे हॅशटॅग टॉप ट्रेंडमध्ये आहेत. 

युरोप, दक्षिण अमेरिका, जपानसारख्या देशांत Facebook, WhatsApp आणि Instagram वापरण्यात अडथळे येत आहेत. भारत, मलेशिया, श्रीलंका आणि इंडोनेशियामध्येही युजर्स फेसबुक आणि  WhatsApp वापरण्यात अडथळे येत आहेत. 

जनरेशन नेक्स्टसाठी सोशल मीडिया म्हणजे मुलभूत गरज मानली जाते. मात्र, काही तासांपासून अपडेटस, नोटफिकेशन आणि पोस्टस बघता येत नसल्याने अनेकांची चांगलीच गोची झाली आहे. मात्र, या सेवा पूर्ववत होण्यासाठी आणखी किती कालावधी जाणार याबाबत संबंधित यंत्रणांकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. 

यापूर्वी मार्च महिन्यातही फेसबुक, गुगल आणि इन्स्टाग्रामची जगभरातील सेवा अशाचप्रकारे ठप्प झाली होती.