दिल्लीचे (Delhi) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (cm arvind kejriwal) यांच्याबाबत ट्विटरवर (twitter) एक आक्षेपार्ह ट्रेंड (Trend) चालवला जात आहे. ट्विटर (twitter) युजर्सनी गेल्या दोन दिवसांपासून अरविंद केजरीवाल (cm arvind kejriwal) आणि आम आदमी पक्षाला (AAP) घेरले आहे. एका ट्विटर अकाउंटला फॉलो करण्यावरुन हा सर्व वाद उफाळून आलाय. अरविंद केजरीवाल हे ज्या ट्विटर अकाउंट फॉलो करायचे ते आता अनफॉलो केलेले दिसत आहे.
सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असलेल्या एका स्क्रीनशॉर्टनुसार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (cm arvind kejriwal) यांनी एका अॅडल्टस्टारचे ट्विटर अकाउंट फॉलो करण्यावरून हा गदारोळ सुरू आहे. यावरुन केजरीवाल यांना ट्रोल करण्यात येत आहे. त्यांच्यावर टीकाही करण्यात येत असून यावरुन अनेक मीम्स बनवण्यात आलेत. मात्र आता या प्रकरणी महत्त्वाची माहिती समोर आलीय.
काही फॅक्ट चेक वेबसाईटनी याबाबत महत्त्वाची माहिती दिलीय. फॅक्ट चेकर्सनी हे अकाउंट पूर्वी वेगळ्या नावाने होते असे निदर्शनास आणून दिलय. पण, ही माहिती लोकांपर्यंत पोहोचण्याआधीच दुसरीच माहिती परसली गेली. यावरुनच अरविंद केजरीवाल आणि पॉर्नस्टार अशीच चर्चा सध्या ट्विटवर सुरुय.
आम आदमी पक्षाकडून याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र अनेक फॅक्ट चेक करणार्या वेबसाइट्सनी या प्रकरणाची चौकशी केली. बूम लाइव्हच्या वृत्तानुसार, या अकाउंटचे नाव आधी 'वेस्टेड व्हिडिओज' (wasted videos) होते. त्याच्याही आधी याचे नाव 'चिल्ड्रेन डुइंग शिट' (children doing shit) असे होते.
या अकाउंटवरुन याआधीच मजेशीर व्हिडिओ टाकण्यात आले होते. अकाउंटचे युजरनेम आणि नाव बदलल्यानंतर त्यावर 7 ऑक्टोबरपासून अश्लील मजकूर टाकला जात असल्याचे अहवालात आढळून आले. हे अकाउंट एप्रिल 2022 मध्ये तयार करण्यात आले होते. या अकाउंटचे 1.25 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
सध्या या ट्विटर अकाउंटचे नाव एस्मी (Esme) असे आहे. एस्मी एक अॅडल्ट फिल्मस्टार आहे. एस्मी आणि अरविंद केजरीवाल यांच्यावरुन अनेक मीम्स बनवण्यात आले. आता त्याच अकाउंटवरून करण्यात आलेलं आणखी एक ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या ट्विटमध्ये केजरीवाल हे ओन्ली फॅन्सच्या अकाउंटचे सब्सक्राइबर आहेत, असे म्हटले आहे. या ट्विटमध्ये केजरीवाल यांना टॅग करण्यात आलं आहे.
दरम्यान, या प्रकरणी केजरीवाल यांच्याकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही. तसेच केजरीवाल यांनी हे अकाउंट कधी पासून फॉलो करण्यास सुरुवात केली याबाबतही कोणतीही माहिती समोर आलेली नाही.