भयंकर VIDEO; फलकनुमा एक्स्प्रेसच्या तीन डब्यांचा जळून कोळसा

Falaknuma Express Fire: भारतीय रेल्वेला हादरा देणारी आणखी एक घटना घडल्याचं वृत्त नुकतंच समोर आलं आहे. Falaknuma express  ला आग लागून या आगीत रेल्वेच्या तीन डब्यांचं नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.   

सायली पाटील | Updated: Jul 7, 2023, 01:30 PM IST
भयंकर VIDEO; फलकनुमा एक्स्प्रेसच्या तीन डब्यांचा जळून कोळसा   title=

Falaknuma Express Fire Latest News: काही दिवसांपूर्वीच (Odissa balasor) ओडिशातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघाताच्या जखमा मिटलेल्या असतानाच आता आणखी एका भयंकर रेल्वे दुर्घटनेचं वृत्त समोर आलं आहे. फलकनुमा एक्सप्रेसला अचानकच आग लागल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेनं प्रसिद्ध केलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार आगीची माहिती मिळताच रेल्वेतील सर्व प्रवासी तातडीनं बाहेर पडले ज्यामुळं कोणतीही जीवित हानी झालेली नाही. 

रेल्वेमध्ये आग उसळल्याचं कळताच ती  बोम्मईपल्ली आणि पगिडीपल्लीदरम्यान तातडीनं थांबवण्यात आली. प्राथमिक माहितीनुसार या रेल्वेतील एस4, एस5, एस6 डबे जळून खाक झाले. दक्षिण मध्य रेल्वेचे सीपीआरओ सीएच राकेश यांनी यासंदर्भातील माहिती दिली. 

हेसुद्धा वाचा : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवा नियम; कार्यालयीन वेळात Computer वापरताना...

प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळं या रेल्वेला आग लागली. ज्यानंतर जीएम अरुण कुमार जैन तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. यापुर्वी झारखंडमध्ये 27 जून रोजी गांधीधाम - हावडा येथून जाणाऱ्या गरबा एक्सप्रेसनंही पेट घेतल्याची घटना घडली होती.  गया-धनबाद ग्रेंड कोड लाइनदरम्यान चौधरीबांध रेल्वे स्थानकादरम्यान ही आग लागली होती. आगीवर वेळीच ताहा मिळवल्यामुळं मोठी हानी टाळता आली. ही रेल्वे जात असताना चौधरीबांध येथीस ट्रॅकमॅनटी नजर रेल्वेच्या चाकांवर गेली तेव्हाच त्यांना तिथं आग लागल्याचं लक्षात आलं. ज्यानंतर त्यांनी यासंदर्भातील सूचना नियंत्रण कक्षाला देत ही रेल्वे तिथंच थांबवण्यात आली होती.