घरातून पळून गेलेल्या मुलीला दिली 'ही' भयंकर शिक्षा!

आपल्या प्रियकरासोबत घरातून पळून गेलेल्या मुलीली तिच्या कुटुंबियांनी भयंकर शिक्षा दिली. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Nov 28, 2017, 05:46 PM IST
घरातून पळून गेलेल्या मुलीला दिली 'ही' भयंकर शिक्षा! title=

मुजफ्फरनगर :  आपल्या प्रियकरासोबत घरातून पळून गेलेल्या मुलीली तिच्या कुटुंबियांनी भयंकर शिक्षा दिली.

कुटुंबियांनी दिली भयंकर शिक्षा 

साधारणपणे घरातून पळून गेलेल्या मुलीशी घरातील सदस्य बोलणे बंद करतात किंवा तिच्यावर बहिष्कार टाकतात. मात्र असे काहीही न करता चक्क त्या मुलीवर सामुहीक बलात्कार करण्यात आला. हा बलात्कार तिचे वडील, भाऊ आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी मिळून केला. 

गुन्हा दाखल

पोलीस ठाण्याचे प्रभारी कुशल पाल सिंग यांनी सांगितले की, इलाहाबाद उच्च न्यायालयात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, बलात्कार केल्यानंतर पीडित मुलीच्या घरच्यांनी मुलीला धमकावले. मात्र तरी देखील तिने हिंमत दाखवून गुन्हा दाखल केला.