दिल्लीत भीषण आग, ४३ जणांचा मृत्यू

 ५० जणांना बाहेर काढण्यात अग्नीशमन दलाच्या जवानांना यश

Updated: Dec 8, 2019, 11:21 AM IST
दिल्लीत भीषण आग, ४३ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : जून्या दिल्लीतील भाजी बाजारात भीषण आग लागली आहे. या आगीत आतापर्यंत ४३ जणांचा मृत्यू झाला आहे तर मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचप्रमाणे ५० जणांना बाहेर काढण्यात अग्नीशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. जून्या दिल्लीतील राणी झांसी रोडवर असलेला फिल्मस्तान सिनेमागृहाबाहेर आग लागली. 

पहाटे पाच वाजता आग लागल्यामुळे सर्वजण गाढ झोपेत होते. घटनास्थळी ३० अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलीस दाखल झालेत. अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात भीतीचे वातावर आहे. आगीत जखमी झालेल्या नागरिकांना जवळच्या एलएनजेपी रूग्णालयात दाखल करण्यात आहे.  

याठिकाणी दोन प्लॉस्टीकचे कारखाणे असल्याचं समोर येत आहे. रस्ता अरूंद असल्यामुळे आडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी अग्नीशमन दलाच्या जवानांना मोठी कसरत करावी लागत आहे. 

रविवार असल्यामुळे वाहतूक कोंडी नाही. पण बघ्यांनी मात्र भरपूर गर्दी केली आहे. त्यामुळे पोलीस गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.