राजस्थानमध्ये महिलेवर केला २३ जणांनी बलात्कार...

बिकानेरमध्ये एका महिलेवर २३ जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना राजस्थान येथे घडली आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Sep 29, 2017, 05:40 PM IST
राजस्थानमध्ये महिलेवर केला २३ जणांनी बलात्कार...  title=
फोटो सौजन्य: सोशल मीडिया

राजस्थान : बिकानेरमध्ये एका महिलेवर २३ जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना राजस्थान येथे घडली आहे. पिडीत महिला मूळची नवी दिल्लीची आहे. या प्रकरणाची तक्रार तिने पोलिसांत केली आहे. पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. 

२५ सप्टेंबर रोजी बिकानेरच्या रिदमलसार पुरोहितन परिसरात ती आली होती. दुपारी अडीच तीनच्या सुमारास बिकानेरला जाण्यासाठी जयपूर रस्त्यावर ती वाहनांची वय पाहत उभी होती. काही वेळात तिच्याजवळ एक कर येऊन थांबली. कारमधून दोघ खाली उतरले आणि तिला लिफ्टसाठी विचारले. तिने नकार दिला. मग त्यांनी जबरदस्तीने हात धरून, तोंड दाबून तिला कारमध्ये बसवले. थोड्या अंतरावर नेऊन तिने तिच्यावर बलात्कार करण्यात आला. इतक्यावरच ते थांबले नाहीत. त्यांनी काही मित्रांना फोन करून बोलावले. 

त्यांनीही माझ्यावर बलात्कार केला. तेथून ते मला एका कार्यालयात घेऊन गेले. तेथे आणखी काही जणांनी बलात्कार केला, असे पिडीत महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणी जय नारायण व्यास कॉलनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पिडीत महिला आरोपींपैकी दोघांना नावाने ओळखत होती. त्यांच्याबाबत माहिती दिल्यानंतर पोलिसांनी राजू आणि सुभाष या दोघांना अटक केली. तसेच इतर चौघांनाही अटक करण्यात आली आहे. 
तर आरोपींनीही या महिलेवर आरोप केले आहेत. महिलेला पूर्वीपासूनच ओळखत असून ही महिला वेश्याव्यवसाय करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्याबाबत चौकशी सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.