मुंबई : इंटरनेटचे जग हे खूप मजेदार आहे, जिथे दररोज मोठ्या संख्येने व्हिडीओ अपलोड केले आणि पाहिले जातात. सोशल मीडियाच्या या जगात कधी कोणते व्हिडीओ कसे व्हायरल होतील हे सांगणं फार कठीण आहे. यामधील काही व्हिडीओ आपले मनोरंजन करतात, तर काही व्हिडीओ आपल्यासमोर उदाहरण ठेवतात. आपण असे व्हिडीओ आवडीने पाहातो आणि आपल्या मित्रांना देखील ते शेअर करतो. सोशल मीडिया हे असं जग आहे, जेथे आपल्याला सर्वप्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात. ते आपलं मनोरंजन देखील करतात.
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ देखील असाच काहीसा आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हाला हसावं की रडावं हे कळणार नाही. खरंतर हा खूप मजेदार व्हिडीओ आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ एका तरुण प्रियकराचा आहे. या व्हिडीओमध्ये हा तरुण प्रियकर आपल्या प्रेयसीच्या जाण्याने फार दु:खी दिसत आहे. परंतु त्यानंतर या व्हिडीओमध्ये जे घडतं ते खूपच आश्चर्यकारक आहे.
खरेतर हा तरुण प्रियकर त्याची प्रेयसी त्याला सोडून गेली म्हणून दु:खी आहे. तो व्हिडीओमध्ये आपल्या प्रेयसीला संदेश देत म्हणतो, "गोल्डी, आज तू जिथे आहेस तिथे आनंदी राहा. मला माहीत आहे की, तू कुणासोबत तरी फिरायला गेली अशील. 14 फेब्रुवारी (व्हॅलेंटाईन डे) साजरा केला अशील. आता तुझा दुसरा प्रियकरही नक्कीच असेल. मला माहित आहे की तू मला सोडून गेली आहेस.''
व्हिडिओमध्ये मुलाची ही प्रतिक्रिया पाहून तुम्हाला देखील काही काळासाठी या तरुणासाठी दु:ख वाटेल, परंतु पुढच्याच क्षणी संपूर्ण गोष्टच बदलते.
या व्हिडीओमध्ये तो मुलगा लगेच दुसऱ्या मुलाशी रिलेशनमध्ये येतो आणि तिच्या सोबत व्हिडीओमध्ये आपल्याला दिसतो. यामध्ये तो पुन्हा एकदा व्हिडीओच्या माध्यमातून संदेश देतो की, "गोल्डी तू गेलीस, काही हरकत नाही. माझ्या दु:खावर उपचार करणारी चंपा मला सापडली आहे. मला ती खूप आवडते."
हे पाहिल्यानंतर तुम्ही पोट धरुन हसल्याशिवाय राहणार नाही, हे नक्की. सर्वसामान्यता मुलांची ही तक्रार असते की, पैसा, घर, नोकरी असली तरी आम्हाला इथे एक मुलगी पटत नाही. याला तर लगेच दुसरी पण पटली.
हा व्हिडीओ कधी आणि कुठचा आहे हे कळू शकलेले नाही. इंस्टाग्रामवर black_lover__ox नावाच्या पेजवर हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. परंतु हे लक्षात घ्या की, कदाचित हा व्हिडीओ मनोरंजन करण्याच्या दृष्टी कोणातुन बनवला गेला असू शकतो.