गर्लफ्रेंडचा शेवटचा KISS होता कि हत्येचा कट, जाणून घ्या

गर्लफ्रेंडचं KISS पडलं महागात, बॉयफ्रेंडने जगाचा निरोप घेतला 

Updated: Aug 20, 2022, 06:21 PM IST
 गर्लफ्रेंडचा शेवटचा KISS होता कि हत्येचा कट, जाणून घ्या  title=

टेनेसी : प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं-आमचं अगदी 'सेम' असतं असं ज्येष्ठ मराठी कवी मंगेश पाडगावकर यांनी त्यांच्या कवितेत म्हटलं आहे. मात्र ही घटना याला अपवाद ठरतेय. कारण य़ा घटनेतील प्रेम हे तुमच्या-आमच्या प्रेमाप्रमाणे अगदी सेम नाही आहे. याउलट ही एक भयानक लव्हस्टोरी आहे असे म्हणायला हरकत नाहीए.कारण या घटनेत एका प्रेयसीने तिच्या प्रियकराचाचं जीव घेतला आहे. हा जीव देखील तिने प्रेमात आकंठ बूडून घेतला आहे. त्यामुळे या घटनेचा अनेकांना मोठा धक्का बसलाय. 

जोशुआ ब्राउन आणि रॅचेल डॉलार्ड या दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होते. रॅचेलचा बॉयफ्रेंड जोशुआ ब्राउन एका प्रकरणात जेलमध्ये होता. त्यामुळे रॅचेल नेहमीच जोशुआला भेटायला जेलमध्ये जायची. असंच नेहमीप्रमाणे ती जोशुआला भेटायला जेलमध्ये गेली होती. ही भेट होताचं दोघांनी एकमेकांना किस केलं. हे किस झाल्याच्या काही मिनिटातच बॉयफ्रेंड जोशुआ ब्राउनचा मृत्यू झाला. या घटनेने टेनेसी तुरुंगात एकचं खळबळ माजली होती. जोशुआ ब्राउनचा अचानक मृत्यू झाल्याने तरूंग प्रशासनालाही मोठा धक्का बसला होता.  

किस नंतर असा झाला मृत्यू 
जेलमध्ये जोशुआ ब्राउनला भेटायला आलेल्या गर्लफ्रेंड रॅचेल डॉलार्डने सर्वप्रथम त्याला किस केलं. हे किस करतानाचं त्याला तिने तोंडावाटे ड्र्ग्सचा सप्लाय केला. हे ड्रग्स घेतल्यानंतर त्याचा अचानक मृत्यू झाला. या घटनेनंतर ड्र्ग्जने तर मृत्यू होत नाही असा सवाल अनेकांना पडलाय. मात्र जोशुआ ब्राउनने या घटनेदरम्यान केलेली चुक त्याला खुप महागात पडली. 

रॅचेल डॉलार्डने तोंडात मेथॅम्फेटामाइन हे ड्र्ग्ज होते. हे संपुर्ण ड्र्ग्ज किस करताना चुकून त्याने एकाच वेळी गिळला. या ड्रग्जचे वजन सुमारे 14 ग्रॅम होते, जे खूप जास्त आहे. जो चुकून तरुणाने एकाच वेळी संपूर्ण गिळला.जे त्याच्या मृत्यूचे कारण बनले. औषधाच्या ओव्हरडोसमुळे ब्राऊनचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. 

अमेरिकेतील टेनेसी येथे ही धक्कादायक घटना घडलीय. या घटनेत कैद्याच्या मृत्यूनंतर आता या महिलेवर खुनाचा आरोप ठेवून अटक करण्यात आली आहे. जोशुआ ब्राउन ड्रग्ज प्रकरणात 11 वर्षांची शिक्षा भोगत होता. त्याच्या मृत्यूनंतर, टेनेसी विभागाच्या सुधारणेच्या एजंटांनी, म्हणजे TDOS, रॅचेल डॉलरर्डला ताब्यात घेतले आणि तिच्यावर अंमली पदार्थांची तस्करी आणि खुनाचा आरोप केला. तसेच तिची रवानगी टेनेसी विभागाच्या हिकमन काउंटी कारागृहात केली आहे.