VIDEO : तो स्टेजवर आला, गिफ्ट दिलं अन् मग नवरदेवावर चाकूने हल्ला, वधूच्या बॉयफ्रेंडचं धक्कादायक कृत्य

Wedding Viral Video : तो स्टेजवर आला, नवरेदव आणि नवरीच्या बाजूला उभं राहून फोटो काढला. पुढच्या क्षणी त्याने नवरदेवावर चाकूने हल्ला केला. लग्नाच्या आनंदाच्या सोहळ्यात काही क्षणात दु:खात बदलला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.   

नेहा चौधरी | Updated: May 22, 2024, 12:05 AM IST
VIDEO : तो स्टेजवर आला, गिफ्ट दिलं अन् मग नवरदेवावर चाकूने हल्ला, वधूच्या बॉयफ्रेंडचं धक्कादायक कृत्य  title=
girlfriend wedding boyfriend climbed over the wall and beat up the groom Wedding Viral Video

Bride Boyfriend Viral Video : लग्न म्हणजे दोन जीवाचं मिलन असतं असं म्हणतात. लग्न म्हणजे अनेक विधी, आनंद आणि धमाल मस्ती...सगळेकडे फक्त आनंदच आनंद असतो. सोशल मीडियावर वधू वराचे लग्नाचे असंख्य व्हिडीओ पाहिला मिळतात. लग्नात सर्वात जास्त आनंदी असतात ते वधू वर...पण काही लग्न असे असतात जिथे वधू वरांच्या मनाविरोधात लग्न लावली जातात. त्यामागे त्यांचं प्रेमप्रकरण असतं. एका लग्नात वधूचा बॉयफ्रेंड लग्नात आला. तो स्टेजवर आला अन् वर आणि वधूच्या बाजूला उभं राहून त्याने फोटो काढला. पुढच्या क्षणी तो वराकडे वळला आणि त्याच्यावर चाकूने हल्ला केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

प्रियकराचा धक्कादायक कृत्य पाहून वधूने हस्तक्षेप केला आणि स्टेजच्या खाली असलेले मंडळी लगेच धावून आले. सोशल मीडियावरील X या प्लॅटफॉर्मवर  घर के कलेश या अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलंय की, लग्नाच्या ठिकाणी माजी प्रियकर आणि वर यांच्यात कबीर सिंगसारखा संघर्ष पाहिला मिळतोय. मिळालेल्या माहितीनुसार वधूचा एक्स बॉयफ्रेंड आणि ती एकाच शाळेत शिकत होते. ही घटना राजस्थानच्या भिलवाडी जिल्ह्यातील आहे. आपल्या गर्लफ्रेंडचं लग्न दुसऱ्या तरुणासोबत होतेय हे तो पाहू शकला नाही. त्यातून त्याने धक्कादायक कृत्य केलं. हा थरकाप उडवणारा व्हिडीओ नेटकऱ्यांची झोप उडवत आहे. 

एका यूजरने लिहिलंय की, "जेव्हा तुम्हाला स्वतःच्या चुकीमुळे मुलगी मिळू शकत नाही, तेव्हा असा राग काढला जातो. भित्रा माणूस." दुसऱ्याने कमेंट केलीय की, "क्राइम पेट्रोलचा हा भाग असून तो गुन्हेगार आहे आणि याची मास्टरमाईंड वधू आहे." आता असं करून काय फायदा? यापूर्वीही असंच एक प्रकरण समोर आली आहेत. 

मध्यतरी असाच एक लग्नातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. जो उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील होता. या व्यक्ती कथित प्रेयसीच्या लग्नात येतो आणि त्याला जबरदस्तीने सिंदूर लावण्याचा प्रयत्न करतो. या घटनेमध्ये मुलीच्या कुटुंबाने त्या व्यक्तीला मारहाण केली आणि पोलिसांनाच्या स्वाधिन केलं.