खूशखबर! रक्षाबंधनाआधी सोन्या-चांदीचे दर घसरले

रक्षाबंधनाच्या आधी जर सोनं खरेदी करण्याचा विचार करणार असाल तर तुमच्यासाठी खूशखबर आहे. आतंरराष्ट्रीय आणि स्‍थानिक स्तरावर कमी मागणीमुळे सोनं आणि चांदीचे दर कमी झाले आहेत.

Updated: Aug 6, 2017, 01:27 PM IST
खूशखबर! रक्षाबंधनाआधी सोन्या-चांदीचे दर घसरले title=

नवी दिल्‍ली : रक्षाबंधनाच्या आधी जर सोनं खरेदी करण्याचा विचार करणार असाल तर तुमच्यासाठी खूशखबरी आहे. आतंरराष्ट्रीय आणि स्‍थानिक स्तरावर कमी मागणीमुळे सोनं आणि चांदीचे दर कमी झाले आहेत.

दिल्लीतील सराफा बाजारात सोनं २०० रुपयांनी कमी झालं आहे. सोन्याचे दर २९४२० रुपये प्रति तोळा झाले आहे. याआधी शुक्रवारी सोन्याचे दर १९० रुपयांनी कमी झाले होते. चांदीचे दर देखील ३९ हजार रुपये प्रति किलोग्रॅम झाले आहे. चांदीचे दर ८२५ रुपयांनी कमी झाले असून आता भाव ३८,५२५ रुपये प्रति किलोग्रॅम झाला आहे. स्थानिक बाजारात 99.9 टक्के शुद्ध असलेलं सोनं २०० रुपयांनी कमी झालं आहे.