Gold Silver Price Today: आज दसरा. हिंदू धर्मातील महत्वाच्या सणांपैकी एक सण. या शुभ मुहुर्तावर मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केली जाते. आज सोन्या-चांदीच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. आज भारतात 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 71 हजार 110 रुपये इतकी आहे. काल हा दर 71,100 इतका होता. याचा अर्थ आज दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव 77 हजार 560 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. काल 24 कॅरेट सोन्याचा भाव 77 हजार 550 रुपये होता. आज दरात बदल झाला आहे. मात्र, येत्या काही दिवसांत सोन्याचे भाव वाढतील, असे बाजारातील जाणकारांचे म्हणणे आहे.आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 7 हजार 111 प्रति ग्रॅम आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत 7 हजार 756 प्रति ग्रॅम आहे.
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये आज 22 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 70,390 रुपये आहे. राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा दर 77,560 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. गाझियाबादमध्ये 22 कॅरेट सोने - प्रति 10 ग्रॅम 71 हजार 110 रुपये इतके आहे.24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 77 हजार 560 रुपये इतकी आहे.
नोएडामध्ये 22 आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 22 कॅरेटसाठी 71,110 रुपये तर 24 कॅरेटसाठी 77,560 रुपये इतकी आहे. मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅमसाठी 70 हजार 960 रुपये इतकी आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 77 हजार 410 रुपये इतकी आहे.
सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन म्हणजेच आयएसओद्वारे हॉलमार्क दिले जातात. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिलेले असते. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. कॅरेट 24 पेक्षा जास्त नसते. कॅरेट जितके जास्त असेल तितके सोने शुद्ध असते.
24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आणि 22 कॅरेट सोने अंदाजे 91 टक्के शुद्ध असते. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यासारखे 9% इतर धातू मिसळून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने आलिशान असले तरी ते दागिने बनवण्यासाठी वापरले जाऊ शकत नाही. त्यामुळे बहुतांश दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचे किरकोळ दर कसे माहिती करुन घ्यायचे? असा प्रश्न नेहमी विचारला जातो. तुम्हालादेखील हा प्रश्न पडला असेल तर 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करू शकता. मिस्ड कॉलच्या काही वेळात एसएमएसद्वारे तुम्हाला सोन्याचे दर पाहता येतील. यासोबतच सोने बाजारातील सतत अपडेट्सच्या माहितीसाठी www.ibja.co किंवा ibjarates.com ला भेट देऊ शकता.
सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. ग्राहकांनी हॉलमार्क चिन्ह पाहूनच खरेदी करायला हवी. हॉलमार्क ही सोन्याची सरकारी हमी असते. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स ॲक्ट, नियम आणि नियमांनुसार चालते.