Indian Railway : लाखो रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मोठी गूड न्यूज

प्रवाशांना इच्छित स्थळी पोहचवण्यासाठी रेल्वे विभाग (Indian Railway) आणि सर्व कर्मचारी हे प्रयत्नशील असतात. प्रवाशांना अहोरात्र सेवा देणाऱ्या या रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आता मोठी गूड न्यूज आहे.  

Updated: Feb 14, 2022, 04:57 PM IST
Indian Railway : लाखो रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मोठी गूड न्यूज title=
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई : भारतीय रेल्वेचं (Indian Railway) जगात सर्वात मोठं जाळं आहे. प्रवाशांना इच्छित स्थळी पोहचवण्यासाठी रेल्वे विभाग आणि सर्व कर्मचारी हे प्रयत्नशील असतात. प्रवाशांना अहोरात्र सेवा देणाऱ्या या रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आता मोठी गूड न्यूज आहे. कर्मचाऱ्यांना लवकरच गूड न्यूज मिळणार आहे. रेल्वे विभागाने रात्रीपाळी भत्त्याच्या (Night Day Allowance) नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. (good news for indian railway employees get night duty allowance soon)
 
या नियमांमधील बदलानंतर आता ज्या कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी ही 43 हजार 600 रुपयांपेक्षा अधिक आहे, त्यांनाही लवकरच हा भत्ता मिळण्याची शक्यता आहे.  सध्या हा प्रस्ताव वित्त मंत्रालयाच्या स्तरावर विचाराधीन आहे. तसेच लवकरात लवकर हा विषय निकाली काढण्यात यावा, अशी विनंती रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात आली आहे.  सुत्रांनुसार, यावर लवकरच निर्णय होऊ शकतो.

रेल्वे मंत्रालयाने (Ministry of Railways) या आधी एक मोठा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयानुसार, 43 हजार 600 रुपयांपेक्षा अधिक बेसिक सॅलरी असलेल्या कर्मचाऱ्यांना रात्र भत्ता न देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे जवळपास 3 लाखांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना मिळणारा रात्रभत्ता हा बंद झाला.       

रात्र भत्ता कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळतो? 

रात्र भत्ता हा महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्यांवर असणाऱ्या लोको पायलट, आणि त्या संबंधित इतर कर्मचाऱ्यांना दिला जातो. मात्र या आदेशानंतर 43 हजार 600 रुपयांपेक्षा अधिक बेसिक असणाऱ्या कर्मचाऱ्याचं हित पाहता, रेल्वे संघटनेने हा भत्ता पुन्हा सुरु करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.   

रेल्वे विभागाकडून पत्रव्यवहार

रेल्वे मंत्रालयाकडून या मागणीसाठी हा मुद्दा आधीच उचलून धरला आहे. याबाबतीत संबंधित विभागाला पत्रव्यवहारही करण्यात आला आहे. या पत्राचं उत्तराची वाट पाहत आहोत, असं रेल्वे बोर्डाचे सचिव म्हणाले.