तिरुवअनंतपूरम: कोणत्याही प्रश्नाचं उत्तर मिळत नसेल तर शेवटचा पर्याय म्हणून मदतीसाठी धाव घेतली जाते ती म्हणजे गुगलकडे. 'गुगल है ना...' असं म्हणत अंतिम उत्तर अचूकपणे देणाऱ्या या विश्वासार्ह सर्च इंजिनकडूनही काही चूक होईल किंवा तो काहीसं अनपेक्षित उत्तर देईल, यावर तुमतचा विश्वास बसेल का? नाही ना... पण यावेळी तसं झालं आहे.
सध्याच्या घडीला भारतातील एकंदर रायकीय परिस्थिती पाहता आणि जनतेमध्ये असणारा असंतोष पाहता वाईट मुख्यमंत्री असं टाईप करुन सर्च केलं असता थेट देशातील एका महत्त्वाच्या राज्यातील मुख्यमंत्र्यांचं नाव समोर येतं. ते नाव म्हणजे केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांचं.
वाईट मुख्यमंत्री म्हणून विजयन यांचं नाव समोर येण्यासोबतच त्यांची माहिती असणारं विकीपीडीयाचं पेजही पॉप अप होतं. केरळमधील सध्याची परिस्थिती, स्थानिकांमध्ये असणारा असंतोष या कारणांमुळेच वाईट मुख्यमंत्री म्हणून विजयन यांचं नाव गुगलकडून समोर येत आहे.
शबरीमला मंदिरात सर्व महिलांच्या प्रवेशाला होणारा विरोध आणि केरळमध्ये हिंसेचा उडालेला भडाक या साऱ्या परिस्थितीला हाताळण्याच विजयन यांचं सरकार अयशस्वी ठरलं असून त्याचा राज्यावरही वाईट परिणाम होत असल्याचं म्हणत अनेकांनीच त्यांच्यावर टीका केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून केरळमध्ये सुरु असणाऱ्या या सर्व घटना आणि त्यामुळे असणारं असमाधान याच कारणांमुळे विजयन यांच्या नावावर गुगलने हा ठप्पा लावल्याचं म्हटलं जात आहे.
Kerala CM Pinarayi Vijayan: Kerala government has decided to bring an ordinance for "prevention of damage of private property and payment of compensation" to protect private property of people during hartal in Kerala. pic.twitter.com/9ZswuC6brv
— ANI (@ANI) January 7, 2019
काही दिवसांपूर्वीच केरळच्या शबरीमला येथे असणाऱ्या अय्यप्पा स्वामी मंदिरात मासिक पाळी येणाऱ्या वयोगटातील महिलांनी प्रवेश केला ज्यानंतर विरोधकांचा विरोध आणखी तीव्र झाला होता. ही सर्व हिंसा पाहता सोमवारी विजयन यांनी माध्यमांशी संवाद साधत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपवर हिंसा भडकवण्याचा आरोप केला होता. आतापर्यंत केरळमध्ये शबरीमला मुद्दावरील वादामुळे ५ हजार ७६९ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, हिंसा भडकवल्याप्ररणी १ हजार ८६९ खटले दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.