नव्या वर्षात कपडे महागणार, 1 जानेवारीपासून निर्णयाची अंमलबजावणी

 कपड्यांवरील GST वाढवल्याने व्यापारी वर्गात असंतोष

Updated: Dec 23, 2021, 10:08 PM IST
नव्या वर्षात कपडे महागणार, 1 जानेवारीपासून निर्णयाची अंमलबजावणी title=

नवी दिल्ली:  नव्या वर्षात अनेक गोष्टी महागणार आहेत. अगदी खाद्यपदार्थांपासून ते कपड्यांपर्यंत. जीवनावश्यक वस्तू म्हणजे कपडे ज्याच्या किंमत येत्या नव्या वर्षात वाढणार आहेत. त्यामुळे तुम्ही जर नव्या वर्षात खरेदी करायचा प्लॅन असेल तर थांबा. 

केंद्राने कापड आणि तयार कपडयांवरील जीएसटी 5 टक्क्यांवरून थेट 12 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 1 जानेवारी 2022 पासून होणार आहे. हा निर्णय मागे घ्यावा यासाठी आता कापड व्यापारी संतप्त झाले आहेत. 

केंद्राच्या या निर्णयाविरोधात कापड व्यापा-यांमध्ये असंतोष असून हा निर्णय मागे न घेतल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा युनायटेड रिटेल ट्रेड अँड गारमेंट असोसिएशननं दिला आहे. जीएसटी  वाढवण्याच्या विरोधात देशातील कापड तसंच तयार कपड्यांशी संबंधित उत्पादक आणि विक्रेत्यांच्या संघटनांनी हे आंदोलन सुरू केलं आहे.

GST दर वाढल्याने सामान्य लोकही नाराज आहेत.  जीएसटी वाढल्यामुळे कपड्यांचे दर मोठ्या प्रमाणावर वाढतील, ज्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे आधीच व्यापारी त्रस्त आहेत. बाजारात मंदीचं वातावरण आहे. त्यातच जीएसटीत वाढ झाल्यास त्याचा फटका व्यापाऱ्यांना बसणार आहे.

नविन वर्ष म्हणजेच 2022 वर्ष सुरु व्हायला अवघे काही दिवस उरले आहेत. पण नविन वर्षात सर्मसामान्यांच्या खिशावरचा बोजा वाढणार आहे. पुढील महिन्यापासून म्हणजेच 1 जानेवारी 2022 पासून सर्वसामान्यांना अनेक गोष्टींवरील वाढत्या कराचा सामना करावा लागणार आहे.