मुंबई : गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूकीत राहुल गांधी यांचा एक वेगळाच "अवतार" पाहायला मिळाला.
राहुल गांधींची आतापर्यंतची प्रचलित असलेली प्रतिमा पूर्णपणे बदलल्याचे दिसत आहे. त्यांनी आता खऱ्या अर्थाने भाजपाला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना टक्कर दिली आहे. याचा परिणाम असा झाला आहे की, खूप वर्षानंतर काँग्रेस गुजरातमध्ये आक्रमक स्वरूपात दिसली. मात्र निकाल हा पार्टीच्या आनंदाचा नाही. पण राहुल गांधींचे प्रदर्शन पूर्णपणे वेगळे होते. अशी चर्चा आहे की, भाजपच्या वोटबँकेत थोड्या फार फरकाने बदल करण्यात काँग्रेस म्हणजेच राहुल गांधी यशस्वी झाले आहेत. आणि याचं संपूर्ण श्रेय हे राहुल गांधीनाच दिले पाहिजे. या निवडणूकीत राहुल गांधींनी अगदी वेगळीच एन्ट्री केली आहे. राजकीय विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार, १३ वर्षाच्या या प्रवाशानंतर आता राहुल गांधी पूर्णपणे तयार झाले आहेत. निकाल हाती आल्यानंतर तज्ञांनी देखील हेच सांगितले की, जरी काँग्रेसचा पराभव असला तरीही त्यांचा हा खऱ्या अर्थाने विजय आहे.
गुजरातमध्ये काँग्रेसचे निवडणूक प्रभारी अशोक गहलोत यांनी एक खास वक्तव्य केलं. काँग्रेस पक्ष गुजरात विधानसभा निवडणूकीत विजयी आहे. राज्यात भाजपाला हरवण्यात काँग्रेस यशस्वी नाही झाला. गहलोत यांनी म्हटलं की, भाजपाने भावनात्मक मुद्यांवर ही निवडणूक लढवली. मोदींनी मतदारांना सांगितलं की, ते गुजरातचा मुलगा आहेत. या निवडणूकीत त्यांची प्रतिष्ठ पणाला लागली आहे.
त्यांनी पत्रकारांना सांगितले की, मात्र काँग्रेसने वास्तविक निवडणूक अभियान केलं आणि किसान, दलित आणि व्यापाऱ्यांच्या संबंधित मुद्यांवर चर्चा केली. आम्ही लोकांशी चर्चा केली आहे. आम्ही त्यांना विचारलं की, गुजरातमध्ये विजय किंवा पराजय झाला असला तरीही त्याचं श्रेय हे अध्यक्ष राहुल गांधींना दिल जाईल का? यावर गहलोत म्हणाले की, हा काल्पनिक प्रश्न आहे. काल्पनिक गोष्टींवर काय चर्चा करायची. जे काही निवडणूकीचा निकाल असेल पण यामध्ये खरे विजयी हे राहुल गांधीच आहेत.
गुजरात विधानसभा निवडणूकीत एकूण १८२ जागा होत्या. १९९५ मध्ये विधानसभा निवडणूकीत भाजपने १२१ आणि काँग्रेसने ४५ जागांवर विजय मिळवला. १९९५ मध्ये भाजपला बहुमत मिळालं होतं. मात्र त्यावेळी भाजपचे दोन दिग्गज नेते शंकर सिंह वघेला आणि केशू भाई पटेल यांच्या मतभेदांमुळे सरकार चाललं नाही.
१९९८ मध्ये विधानसभा निवडणूकीत भाजपला ११७ जागांवर विजय मिळवला तर काँग्रेसला ५३ जागांवर विजय मिळाला. म्हणजे काँग्रेसच्या विजयात वाढ झाली आणि भाजपच्या कमी जागा निवडणून आल्या. मात्र तेव्हाही सरकार भाजपचे बसले. आणि केशू भाई पटेल मुख्यमंत्री बनले. मात्र २००१ मध्ये भाजपच्या केंद्रीय नेतृत्वात केशुभाई पटेल यांच्या जागी नरेंद्र मोदी मुख्यमंत्री बनले.
यानंतर २००२ मध्ये भाजपला १२७ तर काँग्रेसला ५१ जागांवर विजय मिळविला. हा निकाल आतापर्यंतच्या निवडणूकीतील भाजपाच्या चांगले आकडे होते. २००२ नंतर २००७ च्या विधानसभा निवडणूकीत भाजपला ११७ तर काँग्रेसला ५९ जागांवर विजय मिळवला. २००२ ते २००७ या वर्षांत भाजपच्या १० जागा कमी झाल्या तर काँग्रेसच्या ८ जागा वाढल्या.
यांनतर २०१२ मध्ये विधानसभा निवडणूकीत सरकार भाजपचेच आले. मात्र यावेळी भाजपच्या जागा खूप कमी आल्या आणि काँग्रेसच्या जागांमध्ये वाढ झाली. २०१२ मध्ये विधानसभा निवडणूकीत भाजपची ११५ तर काँग्रेसला ६१ जागा मिळाल्या. म्हणजे भाजप २ जागांनी मागे तर काँग्रेस २ जागांनी पुढे होती.