प्रसिद्ध युट्यबर तरुणीचा मृतदेह 11 दिवसांनी सापडला, चाहत्यांना धक्का

ज्या प्रसिद्ध युट्यूबर तरुणीला 11 दिवसांपासून शोधत होते, तिचा अखेर मृतदेह सापडला

Updated: May 23, 2022, 06:01 PM IST
प्रसिद्ध युट्यबर तरुणीचा मृतदेह 11 दिवसांनी सापडला, चाहत्यांना धक्का title=

Crime News : युट्यूबर असलेल्या एका तरुणीची हत्या करुन तिचा मृतदेह पुरण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी ही तरुणी बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या कुटुंबियांनी दिली होती. 11 दिवसांनंतर तिचा शोध लागला. तिच्या अपहरणाची तक्रारही कुटुंबियांनी दाखल केली होती. ही तरुणी मुळची हरियाणा इथली असून दिल्लीत तिची हत्या करण्यात आली.

नेमकी घटना काय?
रविवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास एक व्यक्ती लघुशंकेसाठी मेहम बायपासवर गेला होता. त्यावेळी त्याला रस्त्याच्या कडेला मातीतून एक हात बाहेर आलेला दिसला. घाबरलेल्या त्या व्यक्तीने तातडीने ही गोष्ट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह उकरुन काढला. मृतदेह अर्धनग्न आणि पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत होता. 

एक आठवड्यापूर्वी आरोपींनी तिच्या हत्या करुन मृतदेह पुरला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. तरुणीच्या डोक्यावर जखमेचे व्रण आढळले आहेत. तरुणीच्या कपड्यांवरुन पोलिसांनी तिची ओळख पटवली. यानंतर पोलिसांनी तिच्या कुटुबियांना संपर्क साधला.

तरुणीचं नाव संगीता उर्फ दिव्या असं असून ती प्रसिद्ध युट्यूबर होती. ती एक युट्यूब चॅनेल चालवत होती. तिच्याबरोबर दोन तरुणही या चॅनेलसाठी काम करत होते. पण घटनेच्या दिवसापासून ते दोघंही गायब आहेत. पोलीस त्यांच्या शोध घेत असून त्यांनीच हत्या करुन दिव्याचा  मृतदेह पुरल्याचा पोलिसांना संशय आहे.

त्या दिशेने पोलीस तपास करत असून दोनही तरुणांचा शोध घेतला जात आहे.