Top 50 Companies In World : इंडियन मार्केटमध्ये अंबानी आणि अदानी या उद्याकोजकांसह अनेक बड्या कंपन्यांचा दबदबा आहे. मात्र, सर्वाधिक मार्केट व्हॅल्यु असलेल्या जगातील टॉप 50 कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचे कुठेच नाव गाव नाही. सर्वाधिक मार्केट व्हॅल्यु असलेल्या जगातील टॉप 50 कंपन्यांच्या यादीत पहिल्या स्तानी जी कंपनी आहे तीचे नाव समजल्यावर धक्का बसेल. कारण, या कंपनीचे सर्वाधिक मार्केट हे भारतात आहे.
देशातील सर्वाधिक मार्केट व्हॅल्यु असलेली कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये गेल्या तीन महिन्यांत सुमारे 16 टक्क्यांची घसरण झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजला जगातील टॉप 50 कंपन्यांच्या यादीत स्थान नाही. इंग्रजी वेबसाइट कंपनी मार्केट कॅपने सर्वाधिक मार्केट व्हॅल्यु असलेल्या जगातील टॉप 50 कंपन्यांची यादी जाहीर केली.
या यादीनुसार मुकेश अंबानींची रिलायन्स इंडस्ट्रीज आता या यादीत 57 व्या स्थानावर पोहोचली आहे. कंपनीचे सध्याचे मार्केट कॅप अंदाजे $220.05 अब्ज आहे. मात्र, कंपनीचे शेअर्स वधारले आहेत. BSE वर 0.64% वाढीसह रु. 2730.75 वर व्यापार करत आहेत. कंपनीचे बाजार मूल्य रु. 18,47,821.55 कोटी झाले आहे.
मार्केट व्हॅल्युनुसार जगात अव्वल स्थानी असलेल्याकंपनीचे नाव वाचून धक्का बसेल. ही कंपनी दुसरी तिसरी कोणती नाही तर आयफोन बनवणारी अमेरिकन कंपनी Apple Eus. ॲपल मार्केट कॅपच्या आधारावर अव्वल स्थानावर आहे. Apple चे सध्याचे मार्केट कॅप $3.535 ट्रिलियन आहे, परंतु ते AI चिप निर्माता Nvidia चे तगडे आव्हान कंपनीसमोर आहे. Nvidia चे मार्केट कॅप आता $3.388 ट्रिलियनवर पोहोचले आहे. यानंतर मायक्रोसॉफ्ट $3.101 ट्रिलियनच्या मार्केट कॅपसह तिसऱ्या स्थानावर आहे. Google ची मूळ कंपनी Alphabet $1.987 ट्रिलियनच्या मार्केट कॅपसह चौथ्या स्थानावर आहे, तर अमेरिकन ई-कॉमर्स कंपनी Amazon $1.974 ट्रिलियनसह पाचव्या स्थानावर आहे. अशा प्रकारे, सर्व टॉप 5 कंपन्या अमेरिकेतील आहेत.
सर्वाधिक मार्केट व्हॅल्यु असलेल्या जगातील टॉप 50 कंपन्यांमध्ये अमेरिकेचा जबदबा पहायला मिळतो. यासह सौदी अरेबियाची सरकारी तेल कंपनी सौदी अरामको या यादीत सहाव्या स्थानावर आहे. या कंपनीचे मार्केट कॅप $1.738 ट्रिलियन आहे. या यादीत फक्त दोन भारतीय कंपन्यांना स्थान मिळाले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS). TCS चे मार्केट कॅप $178.36 बिलियन आहे. यामुळे या कंपन्या टॉप 50 च्या यादीत नाहीत. या यादीत 10 चिनी कंपन्यांना देखील स्थान मिळाले आहे. टॉप 100 कंपन्यांमध्ये अमेरिकेचे वर्चस्व आहे. यापैकी जवळजवळ दोन तृतीयांश कंपन्या अमेरिकेतील आहेत. कमाईच्या आधारावर सौदी अरामको पहिल्या स्थानावर आहे, तर वॉलमार्ट महसूल आणि कर्मचाऱ्यांच्या संख्येच्या बाबतीत आघाडीवर आहे.
वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात. यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.
...Read More|
THA
(13.3 ov) 62
|
VS |
MAS
67/2(5.4 ov)
|
| Malaysia beat Thailand by 8 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
INA
(20 ov) 151/9
|
VS |
SIN
155/7(19.1 ov)
|
| Singapore beat Indonesia by 3 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
SA
(20 ov) 213/4
|
VS |
IND
162(19.1 ov)
|
| South Africa beat India by 51 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.