High Return Stock | 1 लाखाचे झाले तब्बल 29 कोटी; तुम्ही गुंतवले असते तर आज कोट्यधीश असता

Share Market Update : होळीच्या आधी शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी नोंदवली गेली. यामध्ये एचडीएफसी बँकेच्या शेअरने मोठी उसळी घेतली होती.

Updated: Mar 18, 2022, 04:49 PM IST
High Return Stock | 1 लाखाचे झाले तब्बल 29 कोटी; तुम्ही गुंतवले असते तर आज कोट्यधीश असता title=

मुंबई : Share Market Update : होळीच्या आधी भारतीय शेअर बाजारात दुसऱ्या दिवशीदेखील तेजी दिसून आली होती. बुधवारी शेअर बाजारात तेजीनंतर गुरूवारी दिवसभर तेजीचे वातावरण होते. 

निफ्टी 17 हजाराच्या पार

गुरूवारी निफ्टी 311 अंकांच्या तेजीसह 17287 च्या पातळीवर पोहचला होता. अमेरिकी फेडरल रिझर्व बँकेच्या व्याजदरांमध्ये वाढ झाल्यानंतर जगभरातील शेअर बाजारात तेजी नोंदवली गेली. त्यात भारतीय बाजारांमध्ये एचडीएफसी बँकेचा शेअर 31 रुपयांनी वाढून 1480 रुपयांवर बंद झाला. 

5 रुपयांपासून 1480 रुपयांवर

एचडीएफसी बँकेच्या शेअरने 5 रुपयांपासून ते 1480 रुपयांपर्यंतचा मोठा प्रवास केला आहे. 1 जानेवारी 1999 मध्ये नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर एचडीएफसीचा शेअर 5.5 2 रुपयांवर लिस्ट झाला होता. आणि काल म्हणजेच 17 मार्च रोजी हा शेअर 1480 रुपयांच्या उच्चांकावर पोहचला होता.

एचडीएफसीच्या शेअरने 23 वर्षात साधारण 295 पट परतावा दिला आहे.  जर तुम्ही 1999 मध्ये या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर, आज त्या गुंतवणूकीचे 29 कोटी रुपयांहून जास्त झाले असते. या शेअरने आतापर्यंत 1725 रुपयांची सर्वोच्च पातळी गाठली होती.