चिंताजनक; देशात गेल्या २४ तासात ७९६४ जणांना कोरोनाची लागण

देशात सतत कोरोना  रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे  

Updated: May 30, 2020, 11:23 AM IST
चिंताजनक; देशात गेल्या २४ तासात ७९६४ जणांना कोरोनाची लागण title=

मुंबई : देशात सतत कोरोना  रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या २४ तासांत तब्बल ७ हजार ९६४ जणांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. शिवाय या धोकादायक विषाणूने २६५ रुग्णांचा बळी घेतला आहे. देशात कोरोना रुग्णांची आकडेवारी आता १ लाख ७३ हजार ७६३वर पोहोचली आहे. त्यापैकी ८६ हजार ४२२ रुग्णांवर देशातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असून आतापर्यंत देशात ४ हजार ९७१ रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे ८२  हजार ३७० रुग्ण कोरोनाच्या विळख्यातून  सुखरूप बाहेर पडल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

लॉकडाऊनचा चौथा टप्पा संपण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मात्र झपाट्याने वाढताना दिसत आहे. शुक्रवारी देशातील मृतांची संख्या ४ हजार ७०६ ऐवढी होती. आज ती संख्या ४ हजार ९७१ पोहोचली आहे.  त्यामुळे मृतांच्या आकडेवारीत भारताने आता चीनला मागे टाकले असल्याचं  चित्र स्पष्ट होत आहे. 

रविवारी लॉकडाऊनचा चौथा टप्पा संपणार आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी 'मन की बात' या कार्यक्रमात लॉकडाऊनच्या पुढच्या टप्प्याबद्दल काही बाबी स्पष्ट करू शकतात अशी माहिती सुत्रांकडून देण्यात येत आहे. 

पाचव्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये मुंबई, ठाणे, पुणे या शहरांचा समावेश असणार आहे. शिवाय 'इकोनॉमिक टाईम्स'नं दिलेल्या माहितीनुसार, ज्या भागांची लॉकडाऊनमधून सुटका होऊ शकते त्या भागांमध्ये हॉटेल्स, मॉल्स आणि रेस्टॉरन्ट १ जून पासून  उघडण्याची परवानगी दिली जाऊ शकते