निष्णात लोकंही ठरले अपयशी ! या फोटोत नक्की घोडे किती? तुमचं उत्तर चुकणार, लावा पैज

सोशल मीडियावर सध्या एक अवघड फोटो व्हायरल होत आहे. ऑप्टिकल इल्युजन असलेल्या या प्रतिमेमध्ये एकूण सात घोडे लपलेले असल्याचे म्हटले आहे (Horse Optical Illuison Photo) परंतु 99 टक्के लोकं हे शोधण्यात अपयशी ठरत आहेत.

Updated: Apr 3, 2022, 03:33 PM IST
निष्णात लोकंही ठरले अपयशी ! या फोटोत नक्की घोडे किती? तुमचं उत्तर चुकणार, लावा पैज title=

मुंबई :आजच्या काळात सोशल मीडिया हा माहितीचा चांगला स्त्रोत बनला आहे. सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या गोष्टी उपलब्ध आहेत. अनेक प्रकारच्या व्हिडीओंसोबतच अनेक प्रकारचे अवघड को़डी असलेले फोटोही इथे व्हायरल होतात.  आज असाच एक फोटो आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलोय..

एक अवघड फोटो गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर फिरत आहे. या फोटोमध्ये काही घोडे आहेत. हा फोटो ऑप्टिकल इल्युजनचा उत्तम नमूना आहे. या फोटोतील घोडे नक्की किती यावर लाखो लोकांनी आपल्या मेंदूला प्रचंड ताण दिला आहे. डोळे मोठ मोठे करून शोधले आहे. काहींनी झुम करून परफेक्ट आकडा शोधण्याचा प्रयत्न केला. परंतू आतापर्यंत 99 टक्के लोक अपयशी ठरले आहेत.

हा फोटो अमेरिकी संकेतस्थळ  Kids Environment Kids Health ने अपलोड केला आहे. आणि विचारले आहे की, या फोटोमध्ये नक्की किती घोडे आहेत. या घोड्यांचा अचूक आकडा सांगताना लोकांचं डोकं भिरभर करायला लागलंय.

Indiatimes

फोटो नीट पाहिल्यावर आपल्याला दिसते की,  या फोटोमध्ये 5 घोडे आहेत.  परंतू हे उत्तर चुकीचं आहे.  

.

.

.

.

.

.

 

Kids Environment Kids Health या संकेतस्थळानुसार या फोटोमध्ये 7 घोडे आहेत. 

5 घोडे आपल्याला त्यांच्या तोंडामुळे दिसू शकतात. तर उर्वरीत दोन घोड्यांपैकी एकाचे फक्त तपकीरी नाक दिसत आहे तर दुसऱ्याचे फक्त मागील शरीर दिसत आहे. तुम्ही पझल एक्सपर्ट असाल तर तुम्हालाही या घोड्यांचा अचूक आकडा सांगता येईल...