Indian Clay Water Pot: सध्या उन्हाळा नाही, पण तरीही थंडगार पाण्याचा ग्लास सहसा कोण नाकारताना दिसत नाही. वातावरणातील उष्णता काही फरकानं कमी झालेली असली तरीही दाह मात्र अद्यापही जाणवत आहे. त्यामुळं शीतपेयांपेक्षा अनेकांचंच प्राधान्य थंडगार पाण्याला असतं. त्यातही माठातलं पाणी असेल तर, दोन घोट जास्तच प्यायले जातात (Clay Pot use).
वीजपुरवठ्याची गरज नाही, फारशी जागा नाही तरीही मातीपासून तयार करण्यात आलेल्या सुबक आकाराच्या माठात पाणी थंड होतं. प्रत्येत घोटात पाण्याचा मधुरपणा जाणवतो. अनेकदा तर माठातील पाणी फ्रिजप्रमाणे थंडगार झालेलं असतं. असं होतं तरी कसं? प्रश्न पडलाय कधी? (how does the water gets chilled in Clay Pot interesting fact science)
शालेय अभ्यासक्रमात तुम्ही बाष्पीभवन हा शब्द बऱ्याचदा ऐकला असेल. विज्ञानाच्या अभ्यासादरम्यान तुम्ही अनेकदा हा शब्द आणि त्याभोवती असणाऱ्या संकल्पनांबाबत लिहिलं वाचलं असेल. तोच संदर्भ इथे लागू होतो.
(clay pot for water) माठात ठेवण्यात आलेल्या पाण्याचं जितकं जास्त बाष्पीभवन होतं, तितकंच पाणी जास्त थंड होतं. मातीच्या भांड्यात बाष्पीभवनाची प्रक्रिया या कारणामुळे साध्य होते की, त्याच्या पृष्टावर लहान छिद्र असतात. ज्यामाध्यमातून पाण्याचे (Water dropplets) थेंब हळुहळू बाहेर येतात आणि वाफेच्या रुपात हवेत एकरुप होतात. हीच ती बाष्पीभवाची प्रक्रिया.
जितकी उष्णता तितकं जास्त थंड होतं पाणी...
बाष्पीभवनाची प्रक्रिया उष्ण (Heat) दिवसांमध्ये अधिक प्रभावीपणे आणि वेगानं होताना दिसते. परिणामी माठाच्या आत असणारं पाणी अधिक थंड होतं. काही निरीक्षणांतून सिद्ध झालं आहे, की माठातील पाणी आरोग्याच्या (Water benefits for health) दृष्टीनं प्रचंड फायदेशीर ठरतं. यामुळं शरीरातील टेस्टेस्टेरॉनही नियंत्रणात राहतं.