लखनऊ : बायको आणि नवऱ्याचं नातं हे वेगळंच असतं. ते एकमेकांमध्ये कितीही भांडले तरी बाहेरील व्यक्तीला ते आपल्या संसारात ढवळाढवळ करु देत नाहीत. त्यात प्रत्येक बाई ही आपल्या नवऱ्याच्या प्रत्येक हालचालींवर नजर ठेऊन असते, ज्यामुळे ती प्रत्येक वेळी आपल्या नवऱ्याकडे संशयाच्या दृष्टीने पाहाते. त्यामुळे कोणतीही बाई किंवा दुसरी महिला तिच्या नवऱ्याच्या आयुष्यात येऊ शकत नाही. एवढंच काय तर असं देखील म्हटलं जातं की, महिलांचं कोणत्याही दुसऱ्या महिलेसोबत पटत नाही. परंतु उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातून एक अशी बातमी समोर आली आहे. जी ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
येथे एक विवाहीत पुरुषाने आपल्या गर्लफ्रेंडशी लग्न केलं. एवढंच काय तर यासाठी त्याच्या बायकोनं त्याला संमती दिली आणि पुढे भांडणं होऊ नये यासाठी त्यावर सॉल्यूशन देखील काढलं. ज्यामुळे त्या दोघींसोबत नवऱ्याच्या आई वडिलांचा देखील फायदा झाला आहे. या प्रकरणाची चर्चा संपूर्ण उत्तर प्रदेश आणि सोशल मीडियावर सुरू झाली आहे.
आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की, असं नेमकं काय घडलं असेल? ज्यामुळे या सगळ्यातून एक चांगला पर्याय निघाला असेल.
ही घटना रामपूर जिल्ह्यातील ढोकपुरी तांडा भागातील आहे. एक विवाहित व्यक्ती सोशल मीडियावर आसाममधील एका मुलीच्या प्रेमात पडला. दोघांमध्ये इतकं प्रेम होतं की, दोघेही चंदीगडमध्ये लिव्ह-इनमध्ये राहू लागले.
काही वेळाने तरुणाला प्रेयसीच्या गरोदरपणाची माहिती मिळाली. यामुळे तो घाबरला आणि चंदीगडहून त्याच्या गावी पळून गेला. त्यानंतर त्याची गरोदर गर्लफ्रेंड त्याला शोधत गावात पोहोचली तेव्हा एकच गोंधळ उडाला. जेव्हा हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले तेव्हा त्या व्यक्तीच्या पहिल्या पत्नीलाही पतीच्या दुसऱ्या लग्नासाठी सहमती द्यावी लागली.
प्रेयसीशी लग्न केल्यानंतर आता हा व्यक्ती दोन बायकांसोबत कसा राहाणार अशा प्रश्न सगळ्यांनाच पडला. यानंतर सोमवारी, मंगळवार आणि बुधवारी तरुण पहिल्या पत्नीसोबत राहणार असल्याचे ठरले. गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी त्याला दुसऱ्या पत्नीसोबत वेळ घालवावा लागतो. तसेच रविवारी तो त्याच्या आई-वडिलांसोबत असणार आहे.
त्यांच्या या युक्तीमुळे दोन्ही बायकांचच नाही, तर नवऱ्याच्या आईवडिलांना देखील फायदा झाला आहे. बऱ्याचदा असं होते की, बायको मुलांमुळे आणि स्वत:च्या संसारामुळे आपल्या आई-वडिलांना द्यायला वेळ मिळत नाही. परंतु या व्यक्तीच्या आयुष्यात दोन महिला आल्यामुळे त्याला आपल्या आई-वडिलांना देण्यासाठी वेगळा वेळ मिळाला आहे.