Husband Wife Fight: संसार म्हटल्यावर भांड्याला भांडं लागणारच, असं आपण नेहमी अनेकांना बोलताना पाहतो. लग्न झालेल्या मंडळींना याचा पुरेसा अनुभव असेलच. कधी नवरा बायकोवर राग काढतो तर कधी बायको नवऱ्यावर. या दोन्ही क्रियेत दुसरी क्रिया सहसा जास्त पाहण्यात येते. तर पहिली क्रिया तुम्ही अनुभवत असाल तर तुमच्या संसाराला मजा नाही, असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. नवरा बायकोच्या भांडणाचे व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होत असतात. अशातच एक व्हिडिओ सध्या तुफान धुमाकूळ घातल असल्याचं पहायला मिळतंय.
तुम्हीच विचार करा.. तुम्ही ऑफिसवरून थकून घरी पोहोचताय आणि समोर असलेली बायको तुम्हाला प्रेमाने जवळ घेण्याऐवजी जर मारहाण करायला सुरूवात केली तर... असाच काहीसा प्रकार घडलाय तो एक बिचाऱ्या पुरूषासोबत. या घटनेचा (Husband Wife Fight Video) व्हिडिओ सध्या पुरूष मंडळींकडून मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय.
आणखी वाचा - "आज पप्पा जिवंत असते तर...", भावाला कॅप्टन पाहून Hardik Pandya भावूक; पाहा Video
पती-पत्नीचा एक व्हिडिओ (Funny Video) इंटरनेटवर सध्या तुफान व्हायरल होताना दिसतोय. ऑफिसमधून काम करून नवरा जेव्हा घरी पोहोचतो. त्यावेळी त्याच्या डोक्यावर हेलमेट होतं. बायको धावत येत असल्याचं पाहताच नवऱ्याने हेलमेट काढलं आणि तिला बोलण्याचा प्रयत्न केला. पण बायको ऐकेल तर खरं ना.. तिने आल्या आल्या लाथा बुक्यांनी नवऱ्याला चोप दिला. डोक्यात पाठीत, पोटात...दे दणादण. पत्नीचा राग पाहून नवऱ्याने गप्पच राहणं पसंत केलं.
Wife beats husband immediately after he gets home pic.twitter.com/I32rzrKoQa
— Crazy Clips (@crazyclipsonly) May 6, 2023
दरम्यान, 20 सेकंदाचा हा व्हिडिओ (Wife beat husband) सध्या तुफान व्हायरल होताना दिसत आहे. व्हिडिओच्या शेवटी बायकेने बोट दाखवत नवऱ्याला धमकी देखील दिल्याचं पहायला मिळतंय. व्हिडिओ (Trending Video) समोर आल्यानंतर अनेक पुरूषांनी कमेंट करत आपल्या वेदना मांडल्या आहे. मी देखील अशा गोष्टी सहन केल्यात भावा, असं म्हणत पुरूष मंडळींनी भावनांना वाट मोकळी करून दिलीये. तर अनेक महिलांनी हे बायकोचं प्रेम असल्याचा दावा केलाय. त्यावरून सोशल मीडियावरच शाब्दिक हाणामारी सुरू झाल्याचं देखील पहायला मिळतंय. तुम्हाला या व्हिडिओवर काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा...