पंतप्रधानपदाचे उमेदवार होण्याचे वृत्त गडकरींनी फेटाळले

 २०१९ लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदाचे उमेदवार होण्याचं वृत्त गडकरी यांनी फेटाळले आहे. त्याचवेळी काँग्रेस आघाडीवर टोला हाणला.

Updated: Dec 21, 2018, 10:30 PM IST
पंतप्रधानपदाचे उमेदवार होण्याचे वृत्त गडकरींनी फेटाळले

नवी दिल्ली : २०१९ लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदाचे उमेदवार होण्याचं वृत्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी फेटाळले आहे. निवडणूक जिंकून पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार असल्याचं वक्तव्य त्यांनी केलेय. महाआघाडी म्हणजे विरोधी पक्षांचा असहाय्यपणा आहे, असा टोला गडकरींचा हाणला.

२०१९ लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदाचे उमेदवार होण्याचं वृत्त गडकरींनी फेटाळून लावले आहे. आपण ज्याठिकाणी आहोत त्याठिकाणी खूष असल्याची प्रतिक्रिया दिलीय. तसंच तीन राज्यांत झालेल्या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसच्या जागांमध्ये जास्त अंतर नव्हतं. ज्या त्रुटी असतील त्यावर लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं काम करु, आणि आम्हीच निवडणूक जिंकू आणि पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील असंही गडकरींनी म्हटलंय.