IAS Success Story:दोनदा प्रीलिम्समध्ये नापास, तरूणीने अशी क्रॅक केली UPSC

Mehek jain IAS Success Story : मेहकने (Mehek jain) तिच्या चुकांवर काम करत तिसऱ्या प्रयत्नासाठी परीक्षेची तयारी सूरू केली. यावेळी तिने प्रीलिम्स, मेन आणि इंटरव्ह्यू परीक्षा उत्तीर्ण करून अंतिम यादीत स्थान मिळवले. तिने केवळ परीक्षाच उत्तीर्ण केली नाही तर 17 वा क्रमांक मिळवून नागरी सेवांमध्ये आयएएस टॉपर्सच्या यादीत स्थान मिळवले. 

Updated: Feb 20, 2023, 07:16 PM IST
IAS Success Story:दोनदा प्रीलिम्समध्ये नापास, तरूणीने अशी क्रॅक केली UPSC title=

Mehek jain IAS Success Story : देशातील असंख्य तरूण-तरूणी यूपीएससीची परीक्षा (UPSC Exam)देत असतात.मात्र या परिक्षेत मोजक्याच तरूणांना यश येते, तर अनेकांना अपयश देखील येते. या परिक्षेच्या काळात सतत अपयशानंतर काही तरूण हार मानून इतर क्षेत्रात नशीब आजमावतात. तर काही असे असतात, जे जिद्दीने लढत असतात. त्यांच्या या जिद्दीला एक ना एक दिवशी यश येतेच. अशीच एक जिद्दीची स्टोरी समोर आली आहे. ही स्टोरी आयएएस ऑफिसर मेहक जैन (Mehek jain) यांची आहे. जैन यांची ही स्टोरी वाचून यूपीएससीच्य़ा परीक्षेसाठी प्रयत्न करणाऱ्या तरूणांना प्रेरणा मिळणार आहे. 

शालेय शिक्षण 

मेहक जैन (Mehek jain) यांनी फरिदाबादच्या सेंट पीटर्स स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी हंसराज कॉलेज, दिल्ली विद्यापीठातून (DU) बी.कॉम ऑनर्स पदवी प्राप्त केली. पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्यांनी जामिया मिलिया इस्लामियामधून लोक प्रशासनात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. मात्र इतकं शिकून सुद्धा मेहक यांना आयएएस अधिकारी व्हायचे होते. 

प्रीलिम्समध्ये अपयश

मेहक (Mehek jain) यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर कोचिंगमध्ये प्रवेश करत नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरू केली. 2019 मध्ये तिने पहिल्यांदा परीक्षा दिली.मात्र तिला प्रीलिम्स परीक्षाही पास करता न आल्याने अपयश आले. मात्र तिने हार मानली नाही आणि दुसऱ्यांदा नव्याने परिक्षेची तयारी सुरु केली. 

दुसऱ्यांदा परिक्षेची तयारी 

मेहकने (Mehek jain) दुसऱ्या प्रयत्नातही कसून तयारी केली. कोचिंग नोट्स आणि पाठ्यपुस्तकांचा आधार घेतला. मात्र तरीही तिला प्रीलिम्स परीक्षेत यश मिळू शकले नाही.प्रीलिम्स परीक्षेत सलग दोन वेळा अपयश आल्यानंतर तिने जिद्दच सोडून दिली होती. मात्र कुटुंबियांनी तिला धीर दिला आणि पुन्हा एकदा तिला परीक्षेसाठी तयार केले. 

तिसऱ्या प्रयत्नात 17 वी रँक 

मेहकने (Mehek jain) तिच्या चुकांवर काम करत तिसऱ्या प्रयत्नासाठी परीक्षेची तयारी सूरू केली. यावेळी तिने प्रीलिम्स, मेन आणि इंटरव्ह्यू परीक्षा उत्तीर्ण करून अंतिम यादीत स्थान मिळवले. तिने केवळ परीक्षाच उत्तीर्ण केली नाही तर 17 वा क्रमांक मिळवून नागरी सेवांमध्ये आयएएस टॉपर्सच्या यादीत स्थान मिळवले. अशाप्रकारे ते आयएएस ऑफिसर बनली आहे. 

अनेकदा एक अथवा दोनदा अपयश आल्यानंतर विद्यार्थी खचून जातात. मात्र जर यश मिळवायच असेल तर तुम्ही धीर सोडला नाही पाहिजे. मेहक जैन (Mehek jain) हिची स्टोरी देखील तशीच आहे. तिची स्टोरी लाखो तरूण-तरूणींसाठी प्रेरणादायी आहे.