13 वर्षांनी मोठ्या असणाऱ्या प्रदीप गावंडेंसोबत का केले लग्न? IAS टीना डाबी म्हणाल्या...

आयएएस टीना डाबी आणि प्रदीप गावंडे कोविडच्या दुसऱ्या लाटेदरम्यान भेटले होते

Updated: Oct 2, 2022, 04:23 PM IST
13 वर्षांनी मोठ्या असणाऱ्या प्रदीप गावंडेंसोबत का केले लग्न? IAS टीना डाबी म्हणाल्या... title=

Tina Dabi Pradeep Gawande Marriage : युपीएससी (UPSC) टॉपर असेलेल्या टीना डाबी (Tina Dabi) दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकल्या आहेत. टीना डाबी 2016 राजस्थान कॅडरच्या आयएएस (IAS) अधिकारी असून 2013 मधील बॅचचे आयएएस प्रदीप गावंडे (Pradeep Gawande) यांच्यासोबत लग्न केले आहे. आयएएस टीना (Tina Dabi) आणि प्रदीप गावंडे त्यांच्या लग्नामुळे (Marriage) खूप चर्चेत होते. दोघांच्या एकत्र येण्याची गोष्टही फारच खास आहे. दोघांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि नंतर लग्न झाले. (Tina Dabi Pradeep Gawande Marriage)

आयएएस टीना डाबी (Tina Dabi) आणि प्रदीप गावंडे (Pradeep Gawande) कोविडच्या (Covid) दुसऱ्या लाटेदरम्यान भेटले होते. दोघेही राजस्थानच्या (rajasthan) आरोग्य विभागात एकत्र काम करत होते. माध्यमांच्या वृत्तानुसार, याच दरम्यान दोघे एकमेकांच्या जवळ आले. एकत्र काम करत असताना दोघांमध्ये मैत्री निर्माण झाली. नंतर हळूहळू त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.

याच काळात दोघांमध्ये भेटीगाठी सुरू झाल्याचंही समजतं. त्यानंतर दोघे जयपूरला जेवायला बाहेर जाऊ लागले. यादरम्यान दोघांनाही एकमेकांबद्दल बरेच काही समजल्या. त्यानंतर हे प्रकरण लग्नापर्यंत पोहोचले. टीना डाबी म्हणाल्या की, प्रदीपने मला आधी प्रपोज केले होते, जरी आम्ही दोघे एकमेकांना पसंत करत होतो. प्रदीप हे टीना डाबी यांच्यापेक्षा 13 वर्षांनी मोठे आहेत.

दोघांमधील वयाच्या अंतराबाबतही टीना डाबी यांनी भाष्य केले आहे.वयाच्या आधारावर नाती ठरवली जात नाहीत. परस्पर समंजसपणा, प्रेम आणि अनुकूलता खूप महत्त्वाची आहे, असे टीना डाबी म्हणाल्या.

टीना डाबी म्हणाल्या की, "कुटुंबाने मला खूप साथ दिली. कोविडच्या दुसऱ्या लाटेदरम्यान मी आणि प्रदीप आरोग्य विभागात एकत्र होतो. यादरम्यान आमची भेट झाली. मग आम्ही चांगले मित्र झालो. लग्नाचा निर्णय घेण्याआधी आम्ही एकमेकांना समजून घेतलं, कुटुंबाची ओळख करून घेतली."

टीना डाबी यांनी एका मुलाखतीत अनेक प्रश्नांवर मनमोकळेपणाने भाष्य केले. त्यांनी महिलांना आयुष्यातल्या दुसऱ्या संधीबद्दलही बरेच काही समजावून सांगितले आहे. पहिलं लग्न मोडल्याच्या दु:ख व्हायला नको  कारण जर तुम्ही ते सांभाळू शकत नसाल तर नातं तोडलेलेच बरे, असेही टीना डाबी म्हणाल्या.

दरम्यान, टीना डाबी यांनी 2018 चे आयएएस अतहर खान यांच्यासोबत लग्न केलं होतं. दोन वर्षांनी त्यांनी तलाक घेतला होता. अतहर खान 2016 मध्ये युपीएससी परीक्षेत दुसऱ्या क्रमांकाचे टॉपर होते. ट्रेनिंगदरम्यान टीना आणि त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. त्यांच्याही लग्नाची बरीच चर्चा रंगली होती.