इन्कम टॅक्स जास्त कापला गेला असेल, तर असा मिळवा परत...

तुम्ही जेवढा आयकर भरणं गरजेचं आहे त्यापेक्षा जास्त आयकर भरला असेल तर तुम्ही रिफंड मिळवण्यासाठी पात्र आहात.

Updated: Jul 27, 2017, 04:23 PM IST
इन्कम टॅक्स जास्त कापला गेला असेल, तर असा मिळवा परत...  title=

नवी दिल्ली : तुम्ही जेवढा आयकर भरणं गरजेचं आहे त्यापेक्षा जास्त आयकर भरला असेल तर तुम्ही रिफंड मिळवण्यासाठी पात्र आहात.

वित्तीय वर्षात तुम्ही जास्त इन्कम टॅक्स भरला असेल तर सरकार तुम्हाला तुम्ही भरलेला इन्कम टॅक्स परत मिळवण्याचा पर्याय देते. यासाठी तुम्हाला ३१ जुलैपर्यंत आरटीआय फाइल करावा लागणार आहे.

असा मोजा अतिरिक्त कापलेला टॅक्स...

- रिटर्न भरल्यानंतर कॅलक्युलेट टॅक्स बटनवर क्लिक करा

- सिस्टममध्ये तुम्ही भरलेल्या माहितीनुसार टॅक्सची आकडेवारी तुम्हाला समोर स्क्रीनवर दिसेल.

- यासोबतच रिफंडची ड्यु डेटही तुम्हाला दिसेल.

- तुम्ही रिफंड मिळवण्यासाठी तुम्हाला पात्र असाल तर refund च्या कॉलममध्ये तुम्हाला हे लिहिलेलं दिसेल.

- पुढच्या स्टेपमध्ये टॅक्स रिटर्न ई-फाईल करा आणि व्हेरिफाय करा

- यानंतर आयकर विभागाकडून तुमच्या दाव्यानुसार व्हेरिफिकेशन आणि रिटर्नची प्रक्रिया सुरू होईल