कोरोना रूग्ण संख्येत वाढ; अमित शहांनी चिंता व्यक्त करत दिल्या सूचना

कोरोनाची दुसरी लाट येण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे.   

Updated: Feb 23, 2021, 08:17 AM IST
कोरोना रूग्ण संख्येत वाढ; अमित शहांनी चिंता व्यक्त करत दिल्या सूचना title=

नवी दिल्ली : गेल्या वर्षी भारतात दाखल झालेल्या कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं होतं. दिवसागणिक वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचं निदर्शनास आलं. पण गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एका अदृश्य पण घातक कोरोना विषाणूने डोकंवर काढलं आहे. कोरोनारूग्णांची वाढती संख्या लक्षात घेत अनेत राज्यात नियम कडक केले असून आरोग्य विभाग देखील सतर्क झालं आहे. दरम्यान, या संपूर्ण परिस्थितीवर गृहमंत्री अमित शाह यांनी देखील चिंता व्यक्त काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. 

कोरोना रूग्णांची वाढती संख्या बघता एक आढावा बैठक देखील झाली. या बैठकीत केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन, गृह सचिव अजय भल्ला आणि इतर महत्त्वाचे मंडळी बैठकीत उपस्थित होते. ज्या राज्यांमध्ये कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने  वाढत आहेत, त्याठिकाणी लसीकरण प्रक्रिया आणि वाढता संसर्ग रोखण्य़ासाठी आवश्यक असलेल्या उपायांवर चर्चा करण्यात आली. असं अमित शाह यंनी सांगितलं आहे. 

5 राज्यामध्ये कोरोना रूग्णांचा आकडा वाढत आहे. 
महाराष्ट्, कोरळ, पंजाब, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. चिंताजनक बाब म्हणजे महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट येण्याची दाट शक्याता देखील व्यक्त करण्यात आली आहे. देशात महामारीची स्थिती अधिक गंभीर होत असल्याचं चित्र समोर आहे. 

गेल्या काही दिवसांपासून रोज १४ हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे देशातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या दीड लाखांवर गेली आहे. महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या 52 हजार 956वर पोहोचले आहेत.