सहा दिवसांच्या बाळासह विमानतळावर आली, पण विमानात बसण्याआधी तुरुंगात पोहोचली... दुधाच्या बाटलीमळे बिंग फुटलं

Crime News : एक महिला सहा दिवसांच्या बाळाला घेऊनव  विमानतळावर आली. तपासणी पूर्ण करत तीने बोर्डिंग पासही मिळवला. पण विमानतळावरील एका कर्मचाऱ्याला महिलेवर संशय आला. तपासणीत या महिलेचं बिंग उघडं पडलं.

राजीव कासले | Updated: Aug 27, 2024, 06:09 PM IST
सहा दिवसांच्या बाळासह विमानतळावर आली, पण विमानात बसण्याआधी तुरुंगात पोहोचली... दुधाच्या बाटलीमळे बिंग फुटलं title=

Crime News : एक महिला सहा दिवसांच्या बाळाला घेऊन वाराणसी विमानतळवार आली. यासाठी तीने सर्व सोपस्कर पूर्ण केलं. वाराणसीवरुन (Varanasi) तिला बंगळुरुला (Bangalore) जायचं होतं. या महिलेबरोबर एक पुरुषही होता. दोघांनी बाळासह सुरक्षा तपासणी पूर्ण करत बोर्डिंग पासही मिळवला. पण त्याचवेळी विमानतळावरील एका कर्मचाऱ्याला महिलेवर संशय आला. त्याने इतर कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती दिली. कर्मचाऱ्यांनी या महिलेवर पाळत ठेवली. महिलेच्या हालचाली संशयास्पद आढळल्याने पोलिसांना खबर करण्यात आली. पोलिसांनी तात्काळ या महिलेला अटक केली. या महिलेच्या चौकशीत जे समोर आलं ते ऐकून पोलीसही हैराण झाले. 

दुधाच्या बाटलीमुळे बिंग फुटलं
वास्तविक ही महिला सहा दिवसांच्या बाळाला बाटलीतून दुध पाजत होती. बाळाला हातळण्याच्या तिच्या हालचालीही संशयास्पद होत्या. त्यामुळे विमानतळावरच्या कर्मचाऱ्यांचा संशय वाढला. त्यामुळे विमानात बसण्याआधीच या महिलेला तुरुंगाची हवा खावी लागलीय.

काय आहे नेमकी घटना?
हे संपूर्ण प्रकरण मानवी तस्करीशी (Human Trafficking) संबंधीत आहे. ही महिला लहान मुलांची खरेदी आणि विक्री करण्याचं काम करत होती. मीडिया रिपोर्टनुसार वाराणसीच्या चंदौलीमधल्या दुल्हीपूर परिसरात एक रुग्णालय आहे. या रुग्णालयाचा मालक जमील खान हा मुलांच्या तस्करीशी जोडला गेला आहे. याच रुग्णालयातून या महिलेने 50000 हजार देऊन सहा दिवसांच्या बाळाची खरेदी केली होती. रुग्णालयातील डॉक्टरांनी या मुलाचं बोगस जन्म प्रमाणपत्रही महिलेला दिलं होतं. पोलिसांनी रुग्णालयाचा मालक जमील खान, महिला आणि विमानतळवर महिलेबरोबर असलेल्या अशोक पटेल नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या महिलेचं नाव निधी असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांना दिलेल्या माहितीत आरोपी निधीने रुग्णालयातून बाळाची खरेदी कशी याची माहिती दिली. 

असा रचला कट
विमानतळाच्या नियमानुसार 7 दिवसांपेक्षा कमी बाळासह विमानातून प्रवास करता येत नाही. विमानतळाच्या काऊंटरवर जन्म पत्रिकेत बाळाचं नाव रुद्रांश सिंह असं नोंदवण्यात आलं होतं, आणि त्याचं वय सहा दिवस असं लिहिण्यात आलं होतं. विमातळावर ही महिला बाळाला घेऊन एकटीच आली होती. तर तिच्यावर नजर ठेवण्यासाठी अशोक पटेल नावाचा व्यक्ती विमाळतळावर उपस्थित होता. महिला बाळाला बाटलीने दूध पाजत होती. अवघ्या सहा दिवसांच्या बाळाला आईचं दूध पाजण्याऐवजी बाटलीने दूध पाजलं जात असल्याने कर्मचाऱ्यांना संशय आला. 

सुदैवाने बाळाची विक्री होण्याआधीच हे प्रकरण उजेडात आलं. बाळाला पोलिसांनी बाल सुधारगृहात ठेवलं आहे, तर आरोपी महिला, पुरुष आणि डॉक्टरांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.