मुंबई: देशात गेल्या काही दिवसांपासून नव्या रुग्णांना कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण कमी होत आहे. मात्र अशी परिस्थिती असूनही चिंता कायम आहे. याचं कारण म्हणजे गेल्या 24 तासांत आतापर्यंत सर्वाधिक कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. हा आकाडा आतापर्यंतचा सर्वात जास्त आहे. गेल्या 24 तासातील आकडेवारी धक्कादायक आहे.
भारतात गेल्या 24 तासांत मृत्यूदराने आतापर्यंतचा रेकॉर्ड तोडला आहे. 94 हजार नवीन लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तर 6148 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. केंद्रीय मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार 24 तासांत 94 हजार 52 लोकांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आतापर्यंत सर्वात जास्त गेल्या 24 तासातली आहे.
India reports 94,052 #COVID19 cases, 1,51,367 discharges & 6148 deaths (highest in one day) in last 24 hrs, as per Health Ministry
Total cases: 2,91,83,121
Total discharges: 2,76,55,493
Death toll: 3,59,676
Active cases: 11,67,952Total vaccination: 23,90,58,360 pic.twitter.com/hS9rDOCDuq
— ANI (@ANI) June 10, 2021
कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ही 19 मे रोजी सर्वात जास्त होती. त्यानंतर पुन्हा एकदा गेल्या 24 तासांत ही आकडेवारी रेकॉर्डब्रेक असल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे.
कोरोनाग्रस्तांमध्ये सलग 28 व्या दिवशी घट झाल्याचं समोर आलं आहे. तर कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या देखील चांगली आहे. गेल्या 24 तासात 1.51 लाखहून अधिक लोकांनी कोरोनावर मात केली आहे.
आतापर्यंत देशात 2 कोटी 76 लाख 55 हजार 493 लोकांनी कोरोना विरुद्धचा लढा यशस्वीपणे दिला आहे. तर देशात अॅक्टिव्ह केसेस कमी होत असल्या तरी मृत्यूचं प्रमाण वाढल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे.