नवी दिल्ली : भारतीय वायुसेनेला गुरुवारी खूप मोठे यश मिळाले आहे. वायुसेनेच्या एमब्रेर ट्रांसपोर्ट एयरक्राफ्ट हवेत उडत असतानाच इंधन भरले गेले.
दोन उडणाऱ्या जहाजांनी हे काम यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. इमर्जन्सी किंवा आपत्कालीन स्थितीत इंधन भरण्यासाठी एअरक्राफ्ट लॅंड करण्याची गरज नाही.
दोन विमानांच्या मदतीने हवेतच एअरक्राफ्टमध्ये इंधन भरले जाऊ शकते.
उडत्या विमानात इंधन भरण्यासाठी पायलट्सना विशेष कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले आहे.
#WATCH An Indian Air Force Embraer transport aircraft specialized to conduct Airborne Early Warning and Control (AEW&C) function, successfully carried out Air to Air Refueling (AAR), pic.twitter.com/GFK0H2iGCV
— ANI (@ANI) November 30, 2017
भारतीय वायुसेना जगभरातील अशा निवडक हवाई दलापैकी एक आहे, ज्यांनी सार्वजनिकरित्या आपल्या क्षमतेचे प्रदर्शन केले आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे हवेत उडणाऱ्या विमानात १० मिनिटांत इंधन भरता आले तर पुढचे ४ तास ते उड्डाण करु शकेल