भारतात कोरोनाग्रस्तांची संख्येत वाढ तरी... आरोग्य मंत्रालयाकडून दिलासादायक माहिती

देशभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या जलदगतीने वाढत आहे, पण 

Updated: Sep 15, 2020, 07:03 PM IST
भारतात कोरोनाग्रस्तांची संख्येत वाढ तरी... आरोग्य मंत्रालयाकडून दिलासादायक माहिती

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या जलदगतीने वाढत आहे, पण कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्याही त्याच गतीने वाढत असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे. भारतात कोरोनातून मुक्त होणाऱ्यांची संख्या ३८ लाख ५० हजारांच्या पुढे गेली आहे. जगभरात ही संख्या सर्वाधिक आहे. सध्या देशात एकूण कोरोनाग्रस्तांपैकी १/५ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

देशातल्या ५ राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या देशाच्या संख्येच्या ६० टक्के आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक २९ टक्के, आंध्र प्रदेशमध्ये ९ टक्के, कर्नाटकमध्ये १० टक्के, उत्तर प्रदेशात ६.८ टक्के आणि तामीळनाडूमध्ये ४.७ टक्के रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भुषण यांनी दिली.

उत्तर प्रदेशात काही आठवड्यांपासून रुग्णांची संख्या वाढत आहे, तर महाराष्ट्रात मृत्यूंचं प्रमाण वाढत आहे. कर्नाटकमध्ये नव्या रुग्ण संख्येत स्थैर्य आलं आहे, तर आंध्र प्रदेश आणि तामीळनाडूमध्ये मागच्या ३ आठवड्यांपासून मृत्यू कमी झाले आहेत, असं राजेश भुषण म्हणाले. 

देशात १८ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात सक्रीय रुग्णसंख्या ५ हजार ते ५० हजारांच्या घरात आहे. फक्त ४ राज्यांमध्ये सक्रीय रुग्णसंख्या ५० हजारांपेक्षा जास्त आहे. मागच्या आठवड्यात ७६ लाख टेस्ट केल्याचं आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं. 

सरकार टेस्टिंगची संख्या वाढवत आहे. ७ जुलैपर्यंत १ कोटी टेस्ट करण्यात आल्या, तर पुढच्या २७ दिवसात १ कोटीपासून २ कोटी टेस्ट झाल्या. यानंतर ४ कोटी टेस्टपासून ५ कोटी व्हायला फक्त १० दिवसांचा वेळ लागला. दिल्लीमध्ये टेस्टची संख्या वाढवायला सांगण्यात आलं आहे, अशी प्रतिक्रिया राजेश भुषण यांनी दिली.