पाकिस्तानी सैनिकांचा गोळीबार, दोन भारतीय नागरिकांचा मृत्यू

जम्मू-काश्मीरच्या (Jammu Kashmir) पुंछ सेक्टरमध्ये मंगळवारी पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात दोन भारतीय नागरिक ठार झाले. 

Updated: Dec 3, 2019, 07:25 PM IST
पाकिस्तानी सैनिकांचा गोळीबार, दोन भारतीय नागरिकांचा मृत्यू  title=

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या (Jammu Kashmir) पुंछ सेक्टरमध्ये मंगळवारी पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात दोन भारतीय नागरिक ठार झाले. पाकिस्तानने पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत पुन्हा पाकिस्तानकडून नागरिक वस्तीला लक्ष्य केले आहे. पाकिस्तानच्या या कारवाईला भारतीय सैन्य जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पाकिस्तान शुक्रवारपासून पुंछच्या कृष्णघाटी, बालाकोट, शहापूर, किरानी आणि मालती सेक्टरमध्ये सातत्याने गोळीबार करीत आहे. 

दरम्यान, दुपारी अडीचच्या सुमारास पाकिस्तानने छोटया शस्त्राद्वारे गोळीबारासह भारताच्या नागरिवस्त्यांवर मारा केला. भारतीय सैन्याकडूनही पाकिस्तानच्या या नापाक कृतीला जोरदार उत्तर दिले आहे. शाहपूर आणि किरनी सेक्टरमध्ये पाकिस्तानने तोफगोळयांचा मारा करण्यात आला आहे.

नोव्हेंबर महिन्यात, नियंत्रण रेषेवर जम्मूच्या सीमावर्ती राजौरी आणि पुंछ जिल्ह्यांमधून गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी सैन्य घुसखोरीच्या प्रयत्नात आहेत. नोव्हेंबर महिन्यात खोऱ्यात मोठ्याप्रणात बर्फ पडल्याने सर्व मार्ग बंद झाले. त्यामुळे काश्मीर खोऱ्यात घुसखोरी करण्याचा फसला होता. आता पुन्हा पाकिस्तानचे सैनिक शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत आहेत, अशी माहिती संरक्षण सूत्रांकडून देण्यात आली.

पाकिस्तान लष्कराचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय सैन्याने हाणून पाडला आहे. जम्मू-काश्मीरच्या पूँछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानी सैन्याने भारताच्या नागरीवस्त्यांना लक्ष्य केले. नियंत्रण रेषेवरील गावांवर पाकिस्तानने गोळीबारासह तोफगोळयांचा मारा केला. यामध्ये दोन नागरीकांचा मृत्यू झाला असून सहाजण जखमी झाले आहेत.