विमान टेकऑफच्या आधी, प्रवासी म्हणाला, मी कोरोना पॉझिटिव्ह आहे आणि...

दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (Indira Gandhi International Airport) येथून पुणे (Pune) येथे जाणाऱ्या विमानाच्या टेकऑफच्या आधी मोठा गोंधळ उडाला. त्याचे कारणही तसेच होते.  

Updated: Mar 6, 2021, 06:41 AM IST
विमान टेकऑफच्या आधी, प्रवासी म्हणाला, मी कोरोना पॉझिटिव्ह आहे आणि...  title=
संग्रहित छाया

मुंबई : देशाची राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (Indira Gandhi International Airport) येथून पुणे (Pune) येथे जाणाऱ्या विमानाच्या टेकऑफच्या आधी मोठा गोंधळ उडाला. त्याचे कारणही तसेच होते. विमान टेकऑफच्या आधी एक प्रवासी म्हणाला, मी कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आहे आणि गोंधळात भर पडली. एका विमान प्रवाशाने क्रू सदस्यांना त्याच्या कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) झाल्याची माहिती दिली. हे ऐकून प्रत्येकजण थक्क झाले आणि लगेचच प्रवाशाला विमानातून खाली उतरविण्यात आले.

विमान दीड तास लेट

गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास इंडिगो उड्डाण क्रमांक 6E286 विमान टेकऑफच्या तयारी होते. याचवेळी एका प्रवाशाने सांगितले, मला कोरोना झाला आहे. प्रवाशाला कोरोना लागण झाल्याची बातमी ऐकून विमानातील सर्वांना मोठा धक्का बसला. त्यानंतर विमान तत्काळ पार्किंग क्षेत्रात नेले आणि प्रवाशाला विमानातून खाली उतरवले गेले. यानंतर संपूर्ण विमान स्वच्छ करण्यात आले होते, त्यामुळे विमान सुमारे दीड तास उशीर झाला. त्यानंतर हे विमान पुण्याच्यासाठी रात्री सातच्या सुमारास रवाना झाले.

इंडिगोकडून अद्याप दुजोरा नाही

शासनाचे आदेश कडक असताना आणि विमानतळाच्या प्रवेशद्वारावर कडक सुरक्षा ठेवूनही, कोरोना पॉझिटिव्ह असूनही ती व्यक्ती विमानात कशी पोहोचली? हा प्रश्न विमानतळाच्या सर्व अधिकाऱ्यांना पडला आहे. त्याचवेळी दिल्ली पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या घटनेबाबत एअरलाइन्स कंपनीकडून कोणतीही तक्रार मिळालेली नाही. किंवा इंडिगोकडून कोणतेही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. तक्रार मिळाल्यावर कारवाई केली जाईल.