'मेरे पैर जल रहे हैं...' मुलाच्या त्या शब्दांनी हळहळला ट्राफिक पोलीस, फोटो व्हायरल

खरंतर दोन मुले रस्ता ओलांडत असताना रणजीत तेथे उभे होते. त्यांपैकी एका मुलाच्या पायात चप्पल नव्हती.

Updated: May 20, 2022, 06:16 PM IST
'मेरे पैर जल रहे हैं...' मुलाच्या त्या शब्दांनी हळहळला ट्राफिक पोलीस, फोटो व्हायरल title=

मुंबई : इंदूरमध्ये डान्स करून वाहतूक नियंत्रित करणारे हवालदार रंजीत कुमार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मध्य प्रदेशातील वाहतूक जवानांमध्ये वेगळी ओळख असलेले रणजीत देशातच नव्हे, तर जगभरात प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर त्यांच्या डान्स स्टाइलचे अनेक व्हिडीओही व्हायरल झाले आहेत. त्यातच रणजीत यांनी आता असं काही काम केलं आहे. ज्याचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. एवढंच काय तर रणजीत आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागले आहेत.

खरंतर दोन मुले रस्ता ओलांडत असताना रणजीत तेथे उभे होते. त्यांपैकी एका मुलाच्या पायात चप्पल नव्हती. ज्यामुळे त्याने रणजीत यांना सांगितले की, त्याचे पाय उन्हामुळे भाजत आहेत. त्यावेळी हवालदार रणजीत यांनी त्या मुलाला सांगितले की, जोपर्यंत वाहतूक थांबत नाही, तोपर्यंत तू तुझे दोन्ही पाय माझ्या पायावर ठेव.

रणजीत सिंग यांनी स्वत: ट्विट करून या घटनेची माहिती दिली आहे. तसेच त्यांनी फोटो देखील शेअर केले आहेत.

खरंतर हे फोटो शेअर करताना हवालदार रणजीत यांनी आपली भावना व्यक्त केली आहे.

रणजीत यांनी आपल्या ट्विटमध्ये मुलांचे फोटोही पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये दोन मुलं त्यांच्या बाजूला उभी आहेत. तर त्यांपैकी एका मुलाने त्याचे पाय रणजीत यांच्या पायावर ठेवले असल्याचे दिसत आहे.

लोक त्यांच्या कामाचे खूप कौतुक करत आहेत. काही जण त्यांना वंदन करत आहेत, तर काही त्यांच्या कार्यावर आपलं मत व्यक्त करत आहेत.

याआधीही रणजीतने अनेकवेळा ट्रॅफिक कंट्रोल करून अनोकांचे जीव वाचवण्यात मदत केली आहे.

TWEET

इंदूर ट्रॅफिक पोलिसात तैनात असलेल्या रणजीत कुमारच्या ट्रॅफिक नियंत्रित करण्याच्या पद्धतीचे सर्वांनाच वेड लागले आहे. बॉलीवूड अभिनेते जॉन अब्राहम, वरुण धवन आणि जॅकलीन यांनीही इंदूरमध्ये त्यांची भेट घेतली होती.