श्रीनगर: अनंतनाग इथून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. यापूर्वी पाकिस्तानचे ड्रोन उद्ध्वस्त केल्यानंतर आता दहशतवाद्यांनी भाजप नेत्याची आणि त्याच्या पत्नीची गोळ्या घालून हत्या केली आहे. भाजप नेता गुलाम रसूल दार आणि त्यांच्या पत्नीची गोळ्या घालून हत्या केली आहे. याआधी देखील दहशतवाद्यांनी भाजपला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होता.
गुलाम रसूल डार कुलगाम इथले भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष होते. भाजप पदाधिकारी व्यतिरिक्त सरपंचही होते. त्यांच्या पत्नीलाही दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या आहेत. सरपंच आणि त्यांच्या पत्नीवर दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर त्यांना तातडीनं उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारा दरम्यान दोघांचाही मृत्यू झाला आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दक्षिणी कश्मीरच्या अनंतनाग परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले होते. त्यांना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं. मात्र त्यांचा मृत्यू झाला होता. PDP अध्यक्ष महबूबा मुफ्ती यांनी ट्वीट करत घडलेल्या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.
#UPDATE | Gulam Rasool Dar, Kulgam BJP Kisan Morcha president, and his wife died in an attack by terrorists in Anantnag: Jammu & Kashmir BJP leader Altaf Thakur
(Visuals from the spot, deferred by unspecified time) pic.twitter.com/1bV80iKFKb
— ANI (@ANI) August 9, 2021
Jammu & Kashmir | Terrorists fired bullets at a couple at Lal Chowk in Anantnag. Both husband & wife have been shifted to hospital. More details awaited.
— ANI (@ANI) August 9, 2021
पंजाबनजीक नुकतेच पाकिस्तानचे ड्रोन भारतीय सैन्य दलाने उद्ध्वस्त केले आहेत. पाकिस्तान आणि दहशतवाद्यांकडून सतत काहीना काही कुरापती सुरू आहेत. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर अलर्ट जारी करण्यात आला असून भारतीय सुरक्षा दल सतर्क आहे.