पैसे मागितले म्हणून वकिलाची महिलेला बेदम मारहाण! सहकाऱ्यांना सोडवावी लागली कुस्ती

Jharkhand News : झारखंडच्या धनबाद दिवाणी न्यायालयात मोठा वाद झाल्याचं पाहायला मिळालं आहे. कोर्टाच्या आवारातच महिला वकील आणि तिची महिला अशिल यांच्यात जोरदार हाणामारी झाल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आकाश नेटके | Updated: Oct 14, 2023, 01:29 PM IST
पैसे मागितले म्हणून वकिलाची महिलेला बेदम मारहाण! सहकाऱ्यांना सोडवावी लागली कुस्ती title=

Crime News : झारखंडच्या (Jharkhand) धनबादमधून (dhanbad civil court) एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. धनबादमध्ये दोन महिलांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी धनबाद दिवाणी न्यायालयाच्या आवारात महिला वकील आणि तिची अशिल यांच्यात मारामारीची घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. वकील आणि ग्राहक यांच्यातील पैशावरून वाद इतका वाढला की त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. काही वेळ दोघांमध्ये हाणामारी झाल्यानंतर इतर वकिलांनी हे भांडण सोडवलं आणि दोघींना वेगळं केलं.

झारखंडच्या धनबाद दिवाणी न्यायालयात पैशाच्या वादातून वकील आणि तिच्या अशिलात जोरदार भांडण झाले. त्यांना पाहण्यासाठी आजूबाजूला मोठा जमाव जमला होता. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सहकारी वकिलांना दोन महिलांना वेगळं करावं लागलं आहे. या घटनेच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दोन्ही महिला एकमेकांविरुद्ध वाईट शब्द वापरल्यानंतर मारामारी करताना दिसत आहेत. दोघेही एकमेकांचे केस आणि कपडे ओढताना दिसत आहेत. त्यानंतर वकील तिच्या अशिलाला जमिनीवर ढकलते. हा लढा थांबवण्यासाठी काही वकिलांना मध्यस्थी करावी लागली.

दोघांमध्ये झालेल्या भांडणामुळे  कोर्टाच्या परिसरात लोकांची गर्दी झाली होती. यानंतर इतर वकिलांनी दोघांचीही सुटका केली. मिळालेल्या माहितीनुसार, महिला अशिल आणि वकील यांच्यात कोर्टात सुरू असलेल्या खटल्याबाबत पैशांबाबत करार झाला होता. या करारानंतर महिला ग्राहकाने महिला वकिलाकडे पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली. परंतु वकिलाने याबाबत टाळाटाळ सुरू केल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर दोघांमधील वाद वाढला आणि तो 'तू तू मैं मैं' सुरु झाली. 

यादरम्यान महिला वकिलाचा अशिलासोबत जोरदार वाद झाला, त्यानंतर महिला वकिलाला राग आला आणि तिने तो आपला राग अशिलावर काढला. वकिलाने तिच्या अशिलाला मारहाण करायला सुरुवात केली. यावेळी महिला ग्राहकाने वकिलालाही धडा शिकवण्याचे ठरवलं आणि जोरदार प्रत्युत्तर दिलं. न्यायालयाच्या आवारात महिला वकील आणि ग्राहक यांच्यात झालेल्या भांडणाच्या घटनेने लोक हैराण झाले आहेत. न्यायालयात पैशाच्या वादातून झालेल्या वकील आणि तिच्या अशिलातील भांडण पाहण्यासाठी आजूबाजूला मोठा जमाव जमला होता. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सहकारी वकिलांना दोन महिलांना सोडवावे लागले.