मुंबई : सोशल मीडिया हे एक असं माध्यम आहे. जिथे आपल्याला वेगवेगळे व्हिडीओ पाहायला मिळतात. ज्यामुळे आपलं मनोरंजन होतं. इथे आपल्याला प्रत्येक कॅटेगरी किंवा कन्टेन्टेचे व्हिडीओ पाहायला मिळतात, जे खूपच मस्त असतात. एवढंच काय तर इथे जुगाडचे इतके व्हिडीओ समोर येत असतात, जे खरोखरंच सर्वांना थक्कं करणारे असतात. लोकं कधी कोणता आणि कसा जुगाड करतील, याचा काही नेम नाही. तसेच भारतात जुगाडू लोकांची कमी देखील नाही, ज्यामुळे आपल्या दिवसेंदिवस नवनवीन जुगाड व्हिडीओ पाहायला मिळतात.
सध्या अशाच एका जुगाडाचा व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहाताना फारच मनोरंजक वाटत आहे, परंतु तो तितकाच धोकादायक देखील आहे.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती शॉपिंग ट्रॉलीमध्ये बसलेला आहे. त्याने एका ट्रकला मागून पकडलं आहे आणि ट्रक सुसाट वेगाने जात आहे. एवढंच नाही तर जोरदार पाऊस देखील पडत आहे. ज्यामुळे आजूबाजूला काय आहे हे धुरकट दिसत आहे. जे खरोखरंच धोकादायक आहे.
Do not try this at home!!!! pic.twitter.com/7n1uGSAk8B
— Morissa Schwartz (Dr. Rissy) (@MorissaSchwartz) August 10, 2022
एकही पैसा खर्च न करता पावसात लवकर घरी पोहोचण्याचा या व्यक्तीचा जुगाड तर सर्वांना आवडला आहे. मात्र हे करणं जीवावर देखील बेतु शकतं. त्यामुळे हा व्हिडीओ पाहाणं कितीही मनोरंजक असलं तरी देखील असं कृत्य तुम्ही कधीही करु नका.
Morissa Schwartz (Dr. Rissy) नावाच्या ट्वीटर अकाउंटवरुन हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. जो शेअर करताना देखील असं कधीही ट्राय करु नका असं कॅप्शन देण्यात आलं आहे. लोक या व्हिडीओला वेगवेगळ्या कमेंट्स देत आहेत. तसेच फार कमी वेळात या व्हिडीओला 11 हजाराहून अधीक व्ह्युज देखील मिळाले आहेत.