कल्पना चावलाच्या स्मृतीदिनानिमित्त देशभवासियांकडून आठवणींना उजाळा...

भारताची पहिली महिला अंतराळवीर कल्पना चावलाचे कोलंबियातील अंतराळ दुर्घटनेत निधन झाले. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Feb 1, 2018, 05:03 PM IST
कल्पना चावलाच्या स्मृतीदिनानिमित्त देशभवासियांकडून आठवणींना  उजाळा... title=

नवी दिल्ली : भारताची पहिली महिला अंतराळवीर कल्पना चावलाचे कोलंबियातील अंतराळ दुर्घटनेत निधन झाले. तो दिवस होता १ फेब्रुवारी. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी  'मन की बात' मध्ये देशाच्या या शूरकन्येच्या स्मृतींना उजाळा दिला.

काय म्हणाले मोदी?

पंतप्रधान मोदी म्हणाले की, १ फेब्रुवारी हा दिवस म्हणजे अंतराळवीर कल्पना चावलाची पुण्यतिथी. तुमची इच्छाशक्ती मजबूत असेल तर महिलांसाठी काहीच अशक्य नाही, असा संदेश कल्पना यांनी आपल्या कामगिरीतून देशवासियांना आणि विशेषकरून देशवासियांना दिला. आज त्यांच्या पुण्यतिथिनिमित्ताने जगभरात कल्पना यांची आठवण काढली जात आहे.

तिची परिस्थिती

कल्पना चावलाचा जन्म १७ मार्च १९६२ मध्ये हरियाणातील करनाल येथे झाला. तिच्या आजूबाजूची सामाजिक स्थिती इतकी प्रतिकूल होती की त्यात तिला तिच्या स्वप्नांचा विचार करणेही कठीण होते. मात्र तरी देखील आपल्या स्वप्नांवर ठाम राहत तिने त्यासाठी कठोर परिश्रम घेतले. अन् अखेर ते साध्य केले. 

तिचे परिश्रम

तिचे प्राथमिक शिक्षण टागोर बाल निकेतन येथे झाले. त्यानंतर चंदीगडच्या पंजाब इंजीनियरिंग कॉलेजमधून कल्पनाने एयरोनॉटिकल इंजिनियरिंग मध्ये बी.टेक केले. टॅक्सस युनिवर्सिटीच्या एयरोस्पेस इंजिनियरिंगमध्ये एम.टेक पूर्ण केल्यानंतर तिने युनिवर्सिटी ऑफ कोलोराडोतून डॉक्टरेट मिळवली. १९८८ मध्ये तिने नासा प्रवेश केला. तिथे तिची नियुक्ती नासाच्या रिसर्च सेंटरमध्ये करण्यात आली.